कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात
कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव ते झगडे फाटा या रस्त्यावर पुंगळ वस्ती नजीक कोपरगाव कडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या अपे रिक्षाला जोराची धकड दिल्याने यातील सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ६ प्रवासी गंभीर जखमी आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव कडून भरधाव वेगाने एक मालवाहूतुक कंटेनर ने झगडे फाटा चौफुलीकडून येणाऱ्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या अपे रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याची घटना शुक्रवार दि 6 मे रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली असून ही धडक इतकी जोराची होती की या धडकेमध्ये चार महिला व दोन पुरुषाचा जागीच मृत्यू झाला असून यात यात रंजनाबाई साहेबराव खरात वय वर्ष ६० रा चांदेकसारे, शैला शिवाजी खरात वय वर्ष ४२ रा श्रीरामपूर, पूजा नानासाहेब गायकवाड वय वर्ष २० रा हिंगणवेडे, प्रगती मधुकर होन वय वर्ष २० रा चांदेकसारे या महिला प्रवाशाच्या समावेश असून तर पुरुष प्रवाशांमध्ये शिवाजी मारुती खरात वय वर्ष ५२ रा श्रीरामपूर तर आत्माराम जमानासा नाकोडे वय वर्ष ६५ रा वावी या प्रवाशांचा जागीच मृत्यू तर रुग्णालयात उपचार घेत असतांना रुपाली राठोड वय वर्ष ४० राहणार सिन्नर या महिलाचा मृत्यू झाला असुन असे एकुण अपघात सात प्रवाशी मृत्यू मुखी पडले आहे. झाला आहे.
तर चौधरी सर्वेश वय वर्ष १२, चौधरी कृष्णाबाई वय वर्ष ४२, विलास खरात वय वर्ष ३०, कावेरी खरात वय वर्ष ५, दुर्वा राठोड वय वर्ष १५, दिगंबर चौधरी वय 40 पोहेगाव हे जखमी असून या जखमी वर कोपरगाव येथी संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. जागीच ठार झालेल्या प्रवाशामध्ये एक कॉलेजची विद्यार्थीनी व एक पती पत्नीचा समावेश असून या घटनेने या घटनेने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या फौजफाट्या सह तत्काळ घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला असून.