ब्रेकिंग
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक सुविधा खूप महत्त्वाचे – अशोकराव रोहमारे
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक सुविधा खूप महत्त्वाचे – अशोकराव रोहमारे

कोपरगांव । विनोद जवरे ।
जवळके येथील के.बी. रोहमारे ज्युनिअर कॉलेज येथे नवीन इमारतीचे भूमिपूजन सोमवार दिनांक 9/5/ 2022 रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मुलांना भौतिक सुविधा या महत्त्वाच्या असतात या इमारतीचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होईल तसेच बी.सी.एस. बी.सी.ए. संगणकीय ज्ञान प्राप्त होण्यासाठी छोटे कोर्स चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहमारे पुढे म्हणाले की लवकरच आपण जवळके गावात लहान मुलांची इंग्लिश मिडीयम स्कूल चालू करणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण प्राप्त होईल.या कार्यक्रमास संचालक लक्ष्मण दादा थोरात ,सरपंच बाबुराव थोरात, बाळासाहेब थोरात,संदीप रोहमारे, सुजित रोहमारे, चंद्रकांत पोकळे , भास्कर तात्या थोरात,अजित औताडे, तसेच कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर. सोनवणे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.