अहिल्यादेवी होळकर यांचा जलसंवर्धनाचा विचार कृतीत उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न महायुती सरकार करीत आहे – आमदार गोपीचंद पडळकर

अहिल्यादेवी होळकर यांचा जलसंवर्धनाचा विचार कृतीत उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न महायुती सरकार करीत आहे – आमदार गोपीचंद पडळकर


अहिल्यादेवी होळकर यांचा जलसंवर्धनाचा विचार कृतीत उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न महायुती सरकार करीत आहे – आमदार गोपीचंद पडळकर
संगमनेर । प्रतिनिधी । “पुण्यश्लोक अहिल्यादेवी तू गोदा-नर्मदेची शान” असा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि हलगीच्या ठेक्यावर नृत्य करीत जलयात्रींनी प्रवरामाईला वंदन करून जलकलश यात्रेत सुपूर्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जलसंवर्धनाची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी जलयात्रा दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरपासून सुरू झालेल्या जलयात्रेचे रात्री उशिरा संगमनेर तालुक्यात स्वागत करण्यात आले. घुलेवाडी तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर अधिकारी आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी मंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि सर्व जलयात्रींचे स्वागत केले. शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करून मंत्री विखे पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

ऑरेंज कॉर्नर येथे वारकरी सेवा संस्थेतील सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत जलयात्रींचे स्वागत केले. वारकरी परंपरेचा फेटा बांधून मंत्री विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार अमोल खताळ यांचे स्वागत करण्यात आले. गणेश नगर येथे मुन्ना पुंड आणि मित्रपरिवाराने जलयात्रेचे स्वागत केले. बस स्थानक परिसरात यात्रेचे स्वागत झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शहरातील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात यात्रेतील सहभागी नेत्यांनी प्रभू श्रीरामांचा जयघोष करून अभिवादन केले. यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रवरामाईच्या मंगलमय पूजनाने झाली. आमदार अमोल खताळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि हजारो जलयात्रींच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून प्रवरेचा जलकलश यात्रेत सुपूर्त करण्यात आला. गंगामाईच्या घाटावर महिलांनी फुगड्या खेळून, तसेच युवकांनी हलगीच्या तालावर नृत्य करून अहिल्यादेवींचा जयजयकार केला.याप्रसंगी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “अहिल्यादेवी होळकर यांचा जलसंवर्धनाचा विचार कृतीत उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न महायुती सरकार करीत आहे. राज्यातील दुष्काळी भागातील गावांना न्याय मिळवून देण्यासाठी, अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले घाट, मंदिरे, बारव ही सर्व जलसंवर्धनाची साधने असल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यावी लागणार आहे. मंत्री विखे पाटील यांच्यासारख्या कर्तबगार मंत्र्यांनी यासाठी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे.”आमदार अमोल खताळ यांनी जलयात्रींचे स्वागत केले. “यानिमित्ताने प्रवरा नदीच्या संरक्षणाचा संकल्प करीत आहोत. प्रवरा नदीच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही, मात्र तिचे नैसर्गिक रूप आणि स्वरूप कायम टिकवून ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.संगमनेरनंतर जलयात्रा जोर्वे, उंबरी बाळापूर आणि आश्वीमध्ये दाखल झाली. या सर्व गावांमध्ये ग्रामस्थांनी यात्रेचे उत्साहात स्वागत केले. जोर्वेमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपस्थित आमदारांनी फुगडी खेळून या उत्साहात सहभाग घेतला. आश्वी येथील स्वागत कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांनी जलयात्रेच्या संकल्पनेचे स्वागत करून जलसाक्षरतेसाठी मंत्री विखे पाटील यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.आमदार गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, “राज्यातील अनेक गावे आज पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. महायुती सरकार आल्यानंतर या सर्व पाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील दुष्काळी भागाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत.”



