ब्रेकिंग

सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये  वाणिज्य शाखेचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान – आयबीपीएस उत्तीर्ण राहुल खेमनर यांचे मार्गदर्शन

सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये  वाणिज्य शाखेचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान – आयबीपीएस उत्तीर्ण राहुल खेमनर यांचे मार्गदर्शन

सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये  वाणिज्य शाखेचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान – आयबीपीएस उत्तीर्ण राहुल खेमनर यांचे मार्गदर्शन
संगमनेर । प्रतिनिधी । सह्याद्री ज्युनियर कॉलेजमधील वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच आयबीपीएस तसेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया परीक्षा उत्तीर्ण झालेले श्री. राहुल सखाराम खेमनर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एम. खेमनर सर उपस्थित होते.

प्रास्ताविकात वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक ए. के. दातीर सर यांनी वाणिज्य शाखेतील विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच श्री. राहुल खेमनर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडत त्यांच्या यशामागील परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी प्राचार्य एस. एम. खेमनर सर यांनी खेमनर कुटुंबाचे वैशिष्ट्य सांगितले की, त्यांच्या तीनही मुली राज्य शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असून मुलगा राहुल खेमनर यांनी आयबीपीएस व एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या दोन्ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन कुटुंबाचा व संस्थेचा गौरव वाढविला आहे.
शिक्षक प्रतिनिधी श्री. जी. एल. गुंजाळ सर यांनी वाणिज्य विभागात राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षांची माहिती गांभीर्याने घेतल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात श्री. राहुल खेमनर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपण सह्याद्री महाविद्यालयाचेच इयत्ता दहावी व बारावीचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले. “आज जे काही संस्कार व यश मिळाले आहे ते सह्याद्री संस्था व आई-वडिलांमुळेच,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध संधी, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम व तयारीचे तंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पीपीटीच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपल्या ध्येयानुसार योग्य स्पर्धा परीक्षा निवडून नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास यश नक्की मिळू शकते, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.बँकिंग व स्पर्धा परीक्षांबाबत सखोल माहिती मुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची नवी ऊर्जा निर्माण झालीयावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री. बी. एस. कुटे सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. जी. एल. गुंजाळ सर व वाणिज्य विभाग प्रमुख श्री. ए. के. दातीर सर प्राध्यापक एन आर जगताप सर, प्राध्यापिका एस. व्ही. म्हस्के मॅडम, प्राध्यापिका व्ही. एम. गुळवे मॅडम आणि प्राध्यापक जी. सी. भवर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. आर. जगताप सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका व्ही. एम. गुळवे मॅडम व प्राध्यापिका एस. व्ही. म्हस्के मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!