एचएएल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आमदार डॉ तांबे यांनी साधला संवाद
नवीन पदाधिकार्यांचा सत्कार
एचएएल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आमदार डॉ तांबे यांनी साधला संवाद
संगमनेर (विनोद जवरे ) उत्तर महाराष्ट्रातील पदवीधर शिक्षक, डॉक्टर आणि विविध कंपन्यांमधील कर्मचारी या सर्वांच्या प्रश्नांसाठी व न्याय हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या एचएएल कंपनीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असून यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्यांनी केला . ओझर येथे एचएएल कामगार संघटनेच्या कार्यालयात त्यांनी अध्यक्ष अनिल मंडलिक, जनरल सेक्रेटरी संजय कुटे, खजिनदार प्रशांत आहेर व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांचा सत्कार केला यावेळी नरेंद्र मोरे यांचेसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, कामगार व शेतकरी हे देशाच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र या दोन्ही घटकांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. सध्या विविध कंपन्या व कामगारांबाबत केंद्र सरकारचे धोरण अत्यंत चुकीचे असून यामुळे अनेक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे.
यासाठी सर्वांनी संघटितपणे काम केले पाहिजे. सध्या महागाई व बेरोजगारी वरचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत विकासाचे मुद्दे बाजूला करून धर्माच्या नावावर जातीभेद व मनभेद करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही असे ते म्हणाले तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता व कामगारांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्यंत माफक दरात आरोग्य सेवा मिळत असून या आरोग्य सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अनिल मंडलिक यांनी केले तर संजय कुटे यांनी आभार मानले