ब्रेकिंग
दशरथ वर्पे हे सतत काम करणारे सेवाव्रती शिक्षक – माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात
आदिवासी आश्रम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापकांचा सत्कार

संगमनेर । प्रतिनिधी । जयहिंद आदिवासी आश्रम शाळेने विविध स्तरावर चांगले यश मिळून राज्य पातळीवर आपला गुणवत्तेतून लौकिक निर्माण केला आहे. या शाळेचे अनेक विद्यार्थी यशस्वीपणे काम करत असून त्यांच्या जीवनाच्या वाटचालीत व शाळेच्या सर्वांगीण विकासाबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे मुख्याध्यापक दशरथ वर्पे हे सतत काम करणारे सेवाव्रती शिक्षक असल्याचे गौरव उद्गार माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती गौरव करण्यात आला यावेळी सेवाव्रती या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. आ. डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, सौ मंगलताई वर्पे, सुधाकर जोशी, विष्णुपंत रहाटळ, प्रा बाबा खरात, मनीष मालपाणी, फादर रॉबर्ट डिकोस्टा, ज्येष्ठ संपादक किसन भाऊ हासे ,के.के थोरात, रामहरी कातोरे, काशिनाथ गोंदे, अक्षय वर्पे, भाऊसाहेब नवले, वडील विठोबा वर्पे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की तालुक्यातील आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 2 ऑक्टोबर 1994 मध्ये जय हिंद आदिवासी आश्रम शाळा सुरू करण्यात आली. शाळेसाठी ग्रामस्थ, परिसरातील नागरी यांनी मोठे सहकार्य केले. अनेक अडचणीवर मात करून या शाळेने लौकिक निर्माण केला. शाळेचे अनेक विद्यार्थी विविध पदांवर काम करत आहे.गोरगरीब आदिवासी समाजातील कुटुंबांमध्ये आनंद निर्माण करण्याचे काम या शाळेच्या माध्यमातून झाले आहे. दशरथ वर्पे यांनी सातत्याने या शाळेच्या लौकिकासाठी योगदान दिले असल्याचे ते म्हणाले तर मा आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व फादर हर्मन बाकर यांचे संस्कार घेऊन वरपे सर यांनी आपले ज्ञानदानाबरोबर समाजकार्य सुरू केले. कामाची अत्यंत धडाडी कोणत्याही कामाला नाही न म्हणणे असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व नक्कीच युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले

तर दशरथ वर्पे म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात शाळेच्या माध्यमातून आदिवासी बांधव व गरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करता आला हे माझे मोठे भाग्य आहे. या शाळेतून दिलेल्या अनेक संकल्पना राज्यासाठी राबवल्या गेल्या असून या कामी सर्व सहकारी व कुटुंबाचे पाठबळ मला मिळाले. सेवा काळामध्ये एकही दिवस स्वतःसाठी सुट्टी घेतली नाही यापुढेही पर्यावरणाच्या माध्यमातून समाजकार्यात आपण सातत्याने काम करणार आहोत असे ते म्हणाले याप्रसंगी सौ दुर्गाताई तांबे , मनीष मालपाणी, डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, सौ भारती अक्षय वर्पे यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी भाऊसाहेब गांडाळ, मंगेश वरपे, योगेश गुंजाळ, तुषार गुंजाळ, शशिकांत सातपुते, भाऊराव वर्पे, दत्तू नेहे, मधुकर गोंदे ,रामा गांडाळ, बाळासाहेब उंबरकर यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी दिलीप बांबळे यांनी केले सूत्रसंचालन बाळकृष्ण गांडाळ यांनी केले .तर दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले यावेळी माजी विद्यार्थी ग्रामस्थ नातेवाईक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हार बुके ऐवजी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट
आयुष्यभर आदिवासी व गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या दशरथ वर्पे यांच्या सेवापुर्ती निमित्त कोणीही हार तुरे बुके न आणता वह्या आणावे असे आवाहन करण्यात आले होते. यावेळी नातेवाईक मित्रपरिवार व उपस्थित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वाह्या आणि शालेय साहित्य दिले आहे.