ब्रेकिंग

मंत्री विखे पाटील यांची बदनामी केल्याच्या कारणाने निमगाव जाळी  येथील गणेश  डेंगळे याच्यावर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मंत्री विखे पाटील यांची बदनामी केल्याच्या कारणाने निमगाव जाळी  येथील गणेश  डेंगळे याच्यावर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

जाहिरात मो-7756045359
मंत्री विखे पाटील यांची बदनामी केल्याच्या कारणाने निमगाव जाळी  येथील गणेश  डेंगळे याच्यावर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

लोणी । प्रतिनिधी । राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा आवाज मॉर्फ करून, तयार केलेली बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये पसरवून लोकांमध्ये संभ्रम आणि मंत्री विखे पाटील यांची बदनामी केल्याच्या कारणाने निमगाव जाळी ता.संगमनेर येथील गणेश मारुती डेंगळे याच्यावर लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गणेश डेंगळे याने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर मंत्री विखे पाटील यांच्या संदर्भात समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल, तसेच त्यांच्या चारित्र्यास हानी पोहोचविण्याच्या दुष्ट हेतूने गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचे निदर्शनास आल्यामुळे, लोणी बुद्रुक येथील कार्यकर्ते अनिल नानासाहेब विखे यांनी लोणी पोलीस ठाणे येथे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मंत्री विखे पाटील यांच्या राजकीय विरोधकांशी संगनमत करून, तयार करण्यात आलेली पोस्ट विखे पाटील यांचे समर्थक आणि त्यांच्या विरोधी गटामध्ये, तसेच दोन समाजांमध्ये द्वेषाची भावना वाढवून शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी अर्जामध्ये केली होती.सदर पोस्टमध्ये गणेश डेंगळे याने केलेले आरोप निराधार, तथ्यहीन असून, त्याचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही. इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ द्वेषपूर्ण व मंत्री विखे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने केल्याच्या कारणाने, लोणी पोलिसांनी गणेश डेंगळे याच्या विरोधात २४ जुलै २०२६ रोजी ३६६/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३५३, ३५३(२), ३५६, ३५१ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!