ब्रेकिंग
साईराजे फाऊंडेशन व रोहमारे महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी जवळके मध्ये गुणवंताचा सन्मान
साईराजे फाऊंडेशन व रोहमारे महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी जवळके मध्ये गुणवंताचा सन्मान

कोपरगाव । प्रतिनिधी ।
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तालुक्यातील जवळके येथील साइराजे फाऊंडेशन च्या वतीने के.बी. रोहमारे महाविद्यालय जवळके चे प्राचार्य दत्तात्रय सोनवणे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल सत्कार समारंभ तसेच गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दि ५ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी 10 – 30 वाजता श्री हनुमान मंदिर सभागृहा जवळके येथे होणार आसल्याची माहिती साईराजे फाऊंडेशनचे संस्थापक पत्रकार विनोद जवरे यांनी दिली. या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, वावी पोलिस निरीक्षक सागरजी कोते,शिर्डी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे, के जे सोमैय्या कॉलेज चे प्राचार्य बी एस यादव, सरपंच बाबुराव थोरात , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष मनीष जाधव आदी सह मान्यवर उपस्थित राहणार आहे