जवळके येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता
जवळके येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगांव तालुक्यातील जवळके येथे मंगळवार दि 9 ऑगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताह विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला.अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे. वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे..टाळ आणि निनाद … भगव्या पताकांची दाटी… जय हरिचा नामघोष…अशा मंगलमय वातावरणात जवळके येथे अनेक वर्षापासुन चांलु आहे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. प.पु.महंत रामगिरीजी महाराज यांचा मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहास 2 ऑगस्ट मंगळवारी सुरूवात झाली होती व 9 ऑगस्ट ला समाप्ती झाली तसेच अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार काकडा आरती,ज्ञानेश्वरी पायायण ,गाथा,भजन,भागवत कथा,हरिपाठ व नामांकित कीर्तनकारांचा कीर्तनाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन दररोज करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ग्रामस्थ- भाविकांनी आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण केली .या सप्ताहाची सांगता दि 9 ऑगस्ट रोजी ह.भ.प नवनाथ महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली तसेच ग्रामस्थ बंधू भगिनींना दिंडीत सहभागी होऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा गजर केला. सप्ताह समाप्तीचे धार्मिक विधी पार पडल्यानतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . अखंड हरिनाम सप्ताहात आई वडिलांची सेवा करणे,जात-पात,गरींब-श्रीमंत भेद न मानता फक्त आणि फक्त भक्ती भाव जपला जातो हाच भक्ती भाव प्रत्येकाला जगण्यासाठी ची नवी ऊर्जा देत असतो . त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजप्रबोधन होणे ही काळची गरज आहेत असे मत यावेळी किर्तनकारांनी मांडले. अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त यांनी उपस्थिती लावली. कीर्तनाला आजुबाजुच्या गावातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याबद्दल समस्त जवळके ग्रामस्थ व सप्ताह कमिटीच्या वतीने आभार मानण्यात आले.