ब्रेकिंग

संवत्सर दरोड्यातील आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची दबंग कामगिरी

संवत्सर दरोड्यातील आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद
कोपरगाव । विनोद जवरे ।
 कोपरगाव तालुक्यातील संवत्सर भागातील  रहिवासी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या वतीवर  दि १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात इसमानी घराचा दरवाजा बळजबरीने तोडत घरात प्रवेश करत घरमालक अनिल सोनवणे यांच्यावर चाकूने वार करत तसेच त्यांची भावजई व आईला देखील जबरी मारहाण करत घरातील इतरांना दमबाजी करत घरातील लाखो रुपयेचा ऐवज घेऊन पसार झाले होते त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण पसरले होते. सदर गुन्हा कोपरगाव शहर पोलिस स्टेशन मध्ये २८७/२०२२ भादविक ३९५, ३९७ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व विभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार व पोलीस अधिकारी यांची विशेष पथके नेमून या गुन्ह्याचा बारकाईने लवकरात लवकर तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सपोनी गणेश इंगळे, दिनकर मुंडे,  पोसई सोपान गोरे, सफौ बाळासाहेब मुळीक, मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, योगेश घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, राहुल साळुंखे, संदीप चव्हाण, दिलीप शिंदे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकॉ  रंणजीत जाधव, रवींद्र धुंगासे, विजय धनेधर, मेघराज कोल्हे, पोहेकॉ संभाजी कोतकर, बबन बेरड, अर्जुन बडे, पोहेकॉ भरत बुधवंत आदींनी वारी, सावळीविहीर, रुई  गावांच्या शिवारातून संशयित आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक कटके यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरचा दरोडेचा गुन्हा दिलीप विकास भोसले रा. कारवाडी शिवार कोकमठाण ता. कोपरगाव यांने त्याच्या साथीदाराच्या मदतीने  केला असल्याची माहिती मिळतात कारवाडी शिवारात लपून बसलेल्या आरोपीच्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला असताआरोपींना  पोलिसांची चाहूल  लागताच ते पळून जाऊ लागले परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करत दिलीप उर्फ गिल्या विकास भोसले रा. काटवाडी कोकमठाण, अनिल अरुण बोबडे रा. वेस तालुका राहाता व राहुल दामू भोसले रा. जेऊर पाटोदा अशांना ताब्यात घेत त्यांच्याकडे वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांच्या साथीदारासह केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करता कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सादर केले असून पुढील कारवाई कोपरगाव शहर पोलीस ठाणे करीत आहे.या दरोड्याचा  गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचा विरुद्ध अनेक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे. सदरची कारवाई विशेष पोलिस निरीक्षक बी.जी.शेखर पाटील, अहमदनगर पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!