ब्रेकिंग

जुलै ऑफ काइंडनेस मधून देवकौठेच्या चिमुकल्यांची पाखरांना साद

या चिमण्यांनो परत फिरा रे

जुलै ऑफ काइंडनेस मधून देवकौठेच्या चिमुकल्यांची पाखरांना साद

जाहिरात मो-7756045359
या चिमण्यांनो परत फिरा रे

संगमनेर । प्रतिनिधी । समाजामध्ये सकारात्मकता वाढीस लागावी याकरता कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून जुलै महिना हा मंथ ऑफ काइंडनेस राबवण्यात येत असून या अंतर्गत रामाजी गेनुजी पा.कहांडळ विद्यालय देवकवठे येथील विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ परिसरात व शाळेच्या प्रांगणात पशुपक्ष्यांना चिमण्यांना खाद्य टाकून परत गावाकडे फिरण्याची साद घातली आहे.

रमाजी गेनुजी पाटील कहांडळ विद्यालय देवकवठे येथे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मंथ ऑफ काइंडेनेस हा अभिनव उपक्रम राबवला. यावेळी संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संजय लहारे, शिक्षक शरद शेवंते, ज्ञानदेव गाडेकर,रंगनाथ वारुंगसे, आशा सूर्यवंशी, सुशील कुमार गायकवाड, अब्दुल गणी पठाण, राजेन्द्र चत्तर,संदिप सोनवणे, मंगेश देसाई आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी समाजातील कटुता दूर होऊन सहिष्णुता आदरभाव आपुलकी जिव्हाळा वाढावा याकरता जुलै महिना हा मंथ ऑफ काइंडनेस म्हणून राबवण्याचे नियोजित केले यांतर्गत संगमनेर तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. देवकवठे गावामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील आजी आजोबांबरोबर गप्पा मारणे आई -वडिलांना शेतीकामात मदत करणे याचबरोबर घर परिसरात स्वच्छता करणे अशी कामे केली. याचबरोबर या चिमण्यांनो परत फिरा रे या उपक्रमांतर्गत घराच्या प्रांगणात व गावातील परिसरात पशुपक्ष्यांचे वाढ व्हावी याकरता त्यांना धान्य टाकले.

कहांडळ विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विद्यालयाच्या बाजूनं असलेल्या घनदाट झाडींच्या भोवती चिमण्या व इतर पाखरांना दाणे टाकले. यावेळी या चिमण्यांनो परत फिरा रे ही सामूहिक साथ सर्वांनी घातली. निसर्गाची गाणी गात. बालगीते व बडबड गीते गात या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम मोठ्या आनंदाने साजरा केला.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक संजय लहारे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये पूर्वी चिमणी, कावळे यांसह खूप पक्षी असायचे मात्र ग्लोबल वार्मिंग ची समस्या पाण्याची दुर्भिक्ष आणि रासायनिक खतांचा वापर यामुळे ग्रामीण भागातील अनेक पशुपक्षी कमी झाली आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशुपक्ष्यांची अत्यंत गरज आहे. मंथ ऑफ काइंडनेस अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पशु पक्षांबद्दल आत्मीयता व जिव्हाळा वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे.

कहांडळ विद्यालयाने कायम गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य दिले असून शिक्षणाच्या अद्यावत सुविधा दिल्या आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये देवकवठे ग्रामस्थ व सिन्नर तालुक्यातील मलढोन, येथील विद्यार्थी व ग्रामस्थ यांचाही मोठा कायम सहभाग असल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपक्रमाचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ. सुधीर तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष भारत शेठ मुंगसे ,उपाध्यक्ष भागवतराव आरोटे, संचालक एकनाथ शेठ मुंगसे, इंजिनीयर सुभाषराव सांगळे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे,सतीश आभाळे, पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे,राजाराम मुंगसे, गणेश सोनवणे, काशिनाथ त्रिंबक कहांडळ, सरपंच सौ ज्योती मोकळ ,चेअरमन तुकाराम कहांडळ, बाबासाहेब गाजरे, ज्ञानेश्वर मुंगसे,मलढोण गावचे सरपंच तानाजी बोंबले , दगडू बोंबले , किसनराव पावले, शिवाजी हलवर, गंगाधर पवार, दिनकर साबळे, अण्णा गेठे यांच्यासह मलढोल व देवकवठे येथील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!