ब्रेकिंग

जुलै फॉर काइंडनेस मधून तालुक्यात विविध उपक्रमांनी आदरभाव वाढला

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून सर्वांनी दयाळूपणा अधिक जोपासला

जुलै फॉर काइंडनेस मधून तालुक्यात विविध उपक्रमांनी आदरभाव वाढला


जाहिरात मो-7756045359
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून सर्वांनी दयाळूपणा अधिक जोपासला
 संगमनेर ( प्रतिनिधी ) समाजामध्ये वाढलेली नकारात्मकता दूर होऊन एकमेकांप्रती आदरभाव जिव्हाळा आत्मीयता निर्माण व्हावी यासाठी कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात सुरू झालेल्या मंथ ऑफ काइंडनेस अंतर्गत तालुक्यात व शहरात विविध उपक्रमांमधून आत्मीयता जिव्हाळा जोपासला जात असून यशोधन मध्ये निर्माण केलेल्या काइंडनेस ट्री विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमांनी बहर आला आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात जुलै फॉर काइंडनेस या उपक्रमांतर्गत काइंडनेस ट्रि बनवण्यात आली असून यावर विद्यार्थी व विविध युवकांनी दिवसभरात राबवलेल्या दयाळूपणाच्या उपक्रमांची पान चिटकवण्यात आली आहे. यामध्ये चिमणी व पाखरांना त्यांचा खाऊ देणे. वृद्ध माणसांना मदत करणे. आई – वडिलांना घर कामात मदत करणे. प्रत्येकाशी आत्मियतेने बोलणे. शक्य होईल तितके एकमेकांना मदत करणे. आजी आजोबांशी गप्पा मारणे. पक्षी प्राणी यांच्या प्रती कृतज्ञता व दयाळूपणा दाखवत जिव्हाळा जपणे असे अनेक उपक्रम प्रत्येक गावात राबवले गेले आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असून या सुखद अनुभवाने पालकांमध्ये वेगळी अनुभूती निर्माण झाली आहे.

यशोधन मधील काइंडनेस ट्री वर याबाबतचे उपक्रम चिटकवण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना पाठिंबासह अनेक सेवाभावी उपक्रम पाहायला मिळत आहे.याबाबत डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सकाळी टीव्ही चालू केला की ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली निगेटिव्ह बातम्यांचा मारा होतो. सोशल मीडिया उघडला की निगेटिव्ह बातम्या पाहायला मिळतात. एकमेकांप्रती द्वेष भावना पसरवली जाते. अमेरिका इराण युद्ध सह सध्या सर्वत्र नकारात्मकता पसरवली जात असून यामधून समाजामध्ये जिव्हाळा व अस्मिता वाढवण्यासाठी संगमनेर तालुक्यामध्ये मंथ ऑफ काइंडनेस हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या अंतर्गत समाजामध्ये एकमेकांप्रती आदरभाव वाढावा. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन व्हावे,शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता निर्माण व्हावी. छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद निर्माण करावा. हा या संकल्पनेचा उद्देश असून संगमनेर तालुक्यात व शहरात युवक नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात जुलै फॉर काइंडनेस मध्ये सहभाग घेतला आहे.

महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने कायम राज्याला विकासासह सहकार व विविध क्षेत्रांमध्ये दिशादर्शक काम केले आहे. एकात्मता मानवता आणि समभाव वाढवणारा संदेश दिला आहे त्याचप्रमाणे डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मंथ ऑफ काइंडेनेस ही संकल्पना अभिनव व दिशादर्शक ठरणारी झाली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!