ब्रेकिंग

अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची हिमालयातील पातालसू शिखरावर यशस्वी चढाई

अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची हिमालयातील पातालसू शिखरावर यशस्वी चढाई

जाहिरात मो-7756045359
अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची हिमालयातील पातालसू शिखरावर यशस्वी चढाई
संगमनेर । प्रतिनिधी । अमृतवाहीनीज  निडो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी राजवीर सौरभ कासार  आणि त्याचा लहान  भाऊ राजदीप सौरभ कासार  यांनी हिमालयातील १३,८९५ फूट उंचीचे पातालसू शिखर यशस्वीपणे सर केले. अवघ्या ८ वर्षांच्या राजवीरने आणि ४ वर्षांच्या राजदीपने कमी वयात हा आव्हानात्मक ट्रेक पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले, अशी माहिती अमृतवाहीनीज निडो इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या अंजली कन्नावार मॅडम यांनी दिली.

या मोहिमेद्वारे दोन्ही भावांनी साहसासाठी वय नव्हे, तर जिद्द आणि उत्साह महत्त्वाचा असतो हे सिद्ध केले असे कुटुंबीयांनी सांगितले.अशा साहसी उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, सहनशीलता आणि निसर्गप्रेम विकसित होते.  विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .अनिल शिंदे, डायरेक्टर ऑफ अकॅडमिक्स डॉ. जे .बी . गुरव, निडो स्कूलच्या प्राचार्या अंजली कन्नावार, सर्व शिक्षक यांनी दोघा भावांडांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.शिक्षक आणि पालकांकडून राजवीर व राजदीप यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!