ब्रेकिंग

डॉ. जयश्रीताई थोरात यांचेकडून निसर्गरम्य तामकड्याचे जलपूजन

डॉ. जयश्रीताई थोरात यांचेकडून निसर्गरम्य तामकड्याचे जलपूजन

जाहिरात मो-7756045359
डॉ. जयश्रीताई थोरात यांचेकडून निसर्गरम्य तामकड्याचे जलपूजन
संगमनेर । प्रतिनिधी । नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटामध्ये असलेल्या व प्रवाशांसह पर्यटकांचे आकर्षण ठरलेला तामकडा धबधबा प्रवाहित झाला असून या तामकड्याचे जलपूजन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले असून हा परिसर पर्यटकांसाठी मोठा आनंददायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चंदनापुरी आनंदवाडी येथील तामकडा पाण्याचे जलपूजन डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते झाले यावेळी समवेत थोरात कारखान्याचे संचालक विजय राहणे, कैलास सरोदे, अनिल क कढणे, मुरलीधर सरोदे ,पप्पू गोसावी ,विनोद राहणे, दगू राहणे, ज्ञानेश्वर सरोदे ,निलेश सरोदे, सौ अर्चना भालेराव ,जयसिंग सरोदे, नंदू राहणे ,सोमनाथ सरोदे ,भाऊराव रहाणे, बबन सरोदे, बाबाजी सरोदे, जगन राहणे रविराज सरोदे आदी उपस्थित होते. यावेळी पाण्याची जलपूजन करण्यात आले.या प्रसंगी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अकोले संगमनेर तालुका हा सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेला आहे. सह्याद्रीच्या या डोंगर रांगांमधून चंदनापुरीचा घाट आणि हा परिसर निसर्गरम्य परिसर ठरला आहे. बाळेश्वर पासून वाहणाऱ्या नदीपासून या घाटामध्ये असलेला तामकडा निर्माण झाला असून पावसाळ्यात प्रवाहित झाला आहे. हिरव्या वनराईच्या कुशीतून पांढराशुभ्र वाहणारा तामकडा हा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

नाशिक पुणे महामार्ग हा प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून हा महामार्ग चौपदरीकरण झाला आहे याचबरोबर आपल्या तालुक्यातून महामार्गाची पूर्ण कॉंक्रिटीकरण झाले आहे. अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात येऊन घाटातून अद्यावत रस्ता तयार झाला आहे.या महामार्गावरून प्रवास करत असताना अनेक पर्यटक या ठिकाणी थांबतात निसर्गाचा आनंद घेतात. याचबरोबर संगमनेर तालुका व जुन्नर तालुक्यातूनही अनेक नागरिक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. तरुणांनी सेल्फी घेताना मोह टाळला पाहिजे असे आवाहन करताना निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षितता ही महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यामधील सर्व गावांमध्ये व परिसरात असलेले ओढे नदी यांच्यावर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले आहे .त्यामुळे मोठी जलसंपत्ती निर्माण झाली आहे. प्रत्येक गावांमधून जास्तीत जास्त बांधारे आणि नालाबर्डींग बांधले असल्याने पाण्याची साठवण होत आहे. पाणीबचत हीच पाणी निर्मिती असून यापुढील काळात कमी पाण्यात जास्त शेती उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले.तर विजय राहणे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये विविध बंधारे बांधल्यामुळे मोठी जलसमृद्धी निर्माण झाली आहे. तामकडा हा आनंदवाडी व चंदनापुरी गावासाठी वरदान ठरणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी युवा काँग्रेसचे तालुक्यातील कार्यकर्ते व गावातील महिला नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!