डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन; तज्ज्ञांचे बहुमूल्य मार्गदर्शन
वांबोरी येथे खरीप मार्गदर्शनासाठी शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालय, विळद घाट यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन; तज्ज्ञांचे बहुमूल्य मार्गदर्शन


वांबोरी येथे खरीप मार्गदर्शनासाठी शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
अहिल्यानगर । प्रतिनिधी । राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषि महाविद्यालय, विळद घाट यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत शेतकरी मेळावाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून मा. श्री. रामहरी मिसाळ (कृषि मंडळ अधिकारी,वांबोरी), मा.श्री. एस. बी. केळकंदे (उपकृषी अधिकारी, वाबोरी), श्री.पी.एस.धांबोरे व श्री. प्रवीण भालेराव (सहाय्यक कृषी अधिकारी, वांबोरी), प्रा. संदिप डमाळे, प्रा.डॉ. दीपिका मावळे (सहाय्यक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, विळदघाट) तसेच कृषिमित्र श्री. सोमनाथ तोडमल उपस्थित होते.

कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे, तसेच गावातील प्रगतशील शेतकरी श्री गणेश जवरे, श्री. संदीप विधाटे, श्री. युवराज पठारे यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी मा. श्री. रामहरी मिसाळ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनाची सखोल माहिती देत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे समाधान केले. तसेच प्राध्यापक संदीप डमाळ यांनी डाळिंब पिकातील कीड व रोग यावरील समस्या व त्याचे एकात्मिक व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन केले तसेच प्रा. डॉ. दीपिका मावळे यांनी पिकाची पाण्याची गरज व अचूक सिंचन पद्धती यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी माननीय श्री. सुभाषरावजी पाटील साहेब माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती, श्री. किरण ससाने सरपंच वांबोरी तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट (अहिल्यानगर) चे संचालक (तांत्रिक) प्रा. सुनील कल्हापुरे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी व सूत्रसंचालन कृषिदूत कु. प्रणव बानकर यांनी केले.आभार प्रदर्शन गावचे सहाय्यक कृषि अधिकारी श्री. प्रवीण भालेराव यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषिदूत कु.प्रतीक दातीर,यश जाधवार, सुशांत ढमाळे, प्रणव बानकर, सुदर्शन घोरपडे आणि अजिंक्य धवन यांनी विशेष परिश्रम घेतले.



