ब्रेकिंग

महाराष्ट्राचे राजहंस नेतृत्व – आमदार बाळासाहेब थोरात

महाराष्ट्राचे राजहंस नेतृत्व – आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर । विनोद जवरे ।

महाराष्ट्र ही संत व विचारवंतांची भूमी आहे. देशाच्या राजकारणाला महाराष्ट्राने कायम दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज , फुले – शाहू – आंबेडकरांचा वारसा सांगणार्‍या या भूमित स्व.यशवंतरावजी चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक क्रांतीचा पाया घालून विकसित महाराष्ट्र निर्माण केला. याच विचारांचा वारसा घेऊन राज्यात कार्यरत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्य जनतेचे खर्‍या अर्थाने आश्वासक व महाराष्ट्राचे राजहंस नेतृत्व ठरले आहे.

      स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन 1985 साली ना. बाळासाहेब थोरात यांनी सर्वात कमी वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाला सुरुवात केली. पाण्यासाठी आग्रह धरताना भंडारदर्‍याच्या पाण्यावर संगमनेर ,अकोले तालुक्याला 30 टक्के हक्क मिळवून दिला. याच काळात गावोगावी दूध संस्थांची निर्मिती करून संगमनेर तालुका हा दुग्ध व्यवसायात अग्रेसर बनवला. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचे जाळे ही निर्माण केले. दुष्काळी भागाकरिता निळवंडे धरणाचा ध्यास घेतलेल्या ना.थोरात यांना 1999 मध्ये राय मंत्रिमंडळातील पहिली संधी मिळाल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेले कॅबिनेट मंत्रीपद न मागता निळवंडे धरणाकरिता पाटबंधारे खात्याचे रायमंत्री पद घेतल.

अगदी पहिल्याच दिवशी निळवंडे च्या कामाची फाईल हाती घेऊन अनेक दिवस रेंगाळलेले निळवंडे खर्‍या अर्थाने 1999 मध्ये कार्यान्वित केले. अनेक अडचणीवर मात करुन आधी पुनर्वसन , मग धरण हा आदर्शवत प्रकल्प राबविला. अनेक अडचणींवर मात करुन निळवंडे धरणाचे काम 2012 पर्यंत पूर्ण केले. याच काळात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवताना कवठे कमळेश्वर , पिंपळगाव कोंझिरा, गणेश वाडी येथील मोठ मोठे बोगदे ही मार्गी लावताना कालव्यांची कामे सुरू ठेवली. यासोबत संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईनची ऐतिहासिक योजना पुर्ण केली. संगमनेर शहरात बस स्थानक, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, नगरपालिका, कवी अनंत फंदी नाट्यगृह, कोर्ट, पंचायत समिती यांसह अनेक वैभशाली इमारती उभारल्या.समृद्ध सहकाराबरोबर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गावोगावी रस्ते, इमारती, जलसिंचन योजना, सिमेंट बंधारे , दवाखाने , शाळा,  विविध सभामंडप असे अनेक विकास कामे सातत्याने राबवली.  सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत अविश्रांत काम करताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातून सलग आठ वेळेस विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा मान मिळवला. आणि आज महाराष्ट्र विधानसभेत सर्वात जेष्ठ प्रतिनिधी म्हणून ते नेतृत्व करत आहेत. संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये प्रत्येक कामाला गती देत त्यांनी पारदर्शकपणे काम केले. शेतकरी , गोरगरीब , कष्टकरी , कामगार  यांच्यासाठी सातत्याने विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. मंत्रिमंडळात महसूल , कृषी , शालेय शिक्षण, रोजगार हमी ,पाटबंधारे अशी महत्वाची खाते भूषवताना या खात्यांना लोकाभिमुख व पारदर्शक बनवले. त्यांच्या कामाचा आवाका मोठा असल्याने पक्षाला मोठा जनाधार मिळवून दिला. काँग्रेस पक्षाची प्रामाणिकता व एकनिष्ठता यासंह सर्व कामांची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने भाजपप्रणीत असलेल्या गुजरात सारख्या महत्त्वाच्या रायात निवड समितीच्या अध्यक्षपदी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली.

 ही जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली. याचबरोबर गुजरातचे हिमाचल प्रदेश निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून श्रीमती सोनिया गांधी यांनी मार्च 2018 मध्ये काँग्रेसच्या अतिमहत्वाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटी वर कायमस्वरूपी सदस्य म्हणून निवड केले आणि त्यांचे नेतृत्व अधोरेखित झाले.पुढे पक्षाला उभारी देण्याबरोबर विविध निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची पीछेहाट झाली. अशातच अनेक जण पक्षांतर करू लागले. आणि या अडचणीच्या काळात काँग्रेसच्या अध्यक्षांनी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. स्वातंत्र्यसैनिकांचे चिरंजीव असलेले नामदार बाळासाहेब थोरात यांनी ही जबाबदारी स्वीकारली. अडचणीत असताना पळायचे नसते तर लढायचे असते हे सांगून सर्व काँग्रेसजनांना प्रोत्साहित केले.

पक्षाला पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढले आणि विधानसभेमध्ये काँग्रेसचे दमदार आगमन झाले. काँग्रेस – राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाविकास आघाडी होवून रायात नवीन सरकार स्थापन झाले.यामुळे रायाच्या राजकारणात आज त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. नामदार उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे महसूलमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना पक्षप्रमुख आणि महत्त्वाचे मंत्री अशी दोन्ही जबाबदारी ते सक्षम पणे पार पाडत आहेत.

2020 मध्ये कोरोना संकटाने जगासह भारत देश ठप्प झाला. लॉकडाऊन मुळे अनेकांचे स्थलांतर होवू लागले.अशा अडचणीच्या काळात कोरोनाचा सामना करतांना दररोज 18 तास काम करुन नामदार थोरात यांनी शर्थीने महसूल विभाग व प्रशासनाचे नेतृत्व केले. कोरोना पाठोपाठ चक्रीवादळ,अतिवृष्टी यामध्ये शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला.यामुळे रायातील शेतकरी, कष्टकरी ,गोरगरीब त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे. सहकार, शिक्षण ,कृषी, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रामध्ये नामदार थोरात यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.  महाराष्ट्राच्या विकासासाठी व ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी नामदार थोरात यांचे नेतृत्व सर्वांसाठी आश्वासन ठरत आहे. आगामी काळात नामदार उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  समवेत नामदार बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील अग्रगण्य राय घडवतील यामध्ये कोणतीही शंका नाही. म्हणून रायाचे राजहंस असलेले नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा

शब्दांकन – आ.डॉ.सुधीर तांबे

संकलन – विनोद जवरे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!