दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीतून सामाजिक बांधिलकी जपणे प्रेरणादायी !
वारीत टेके पाटील ट्रस्टच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर
दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीतून सामाजिक बांधिलकी जपणे प्रेरणादायी !
वारीत टेके पाटील ट्रस्टच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर
कोपरगाव : विनोद जवरे
वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल टेके यांचे सामाजिक कार्य खूप मोठे होते. गरजवंताना सर्व प्रकारची मदत करण्याची त्यांच्यात कसब होती. समाजातील वंचित घटकांबद्दल त्यांची तळमळ होती. त्यांना अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिंमत्त्वास पावणेदोन वर्षापूर्वी मुकलो असतानाही त्यांचा मित्र परिवार, कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ विविध सामाजिक उपक्रमांनी त्याच्या स्मृती कायम ठेवत आहे, निश्चितच हे कार्य प्रेरणादायी असल्याचे कोपरगाव पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी तथा वारी ग्रामपंचायतचे प्रशासक बाळासाहेब साबळे यांनी म्हंटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्ट व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने राहुल दादा टेके यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी ( दि.५ फेब्रुवारी ) वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबीर संपन्न झाले. शिबिराची सुरुवात राहुल दादा टेके यांचे प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली. या शिबिरात सुमारे १५० पेक्षा जास्त रुग्णांनी आपली मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच २९ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून प्रशासक साबळे बोलत होते. यावेळी उपस्थितांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गोदावरी बायोरिफायनरीजचे संचालक सुहास गोडगे, सरव्यवस्थापक बी. एम. पालवे, माजी सभापती मच्छिंद्र टेके, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव, कोल्हे कारखाण्याचे माजी संचालक फकिरराव बोरनारे, सरपंच सतीश कानडे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, कामगार तलाठी प्रसाद कदम, कृषी सहायक तुषार वसईकर, तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. हर्षल पाठक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद काकडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खिलारी, सागर करडे, बद्रीनाथ जाधव, प्रकाश गोर्डे, एम.के.टेके, नरेद्र ललवाणी, विजय गायकवाड, ताराचंद सात्राळकर, विशाल गोर्डे, अशोक गजभिव, अशोक बोर्डे, यांच्यासह गावातील सर्वच प्रतिष्ठित मान्यवर, राहुलदादावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बी.एम.पालवे, सुरेश जाधव, ताराचंद सात्राळकर, बद्रीनाथ जाधव, महेश चव्हाण, सागर करडे, स्वर्गीय राहुल दादाच्या सामाजिक कार्याच्या आठवणीना उजाळा दिला. शिबीर यशस्वितेसाठी ग्रामस्थ, मित्र परिवार, सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोहित टेके यांनी केले तर गोरख टेके आभार मानले.