ब्रेकिंग

लोकनेते आमदार थोरात हे राज्याचे सर्वमान्य नेतृत्व – देशमुख महाराज


लोकनेते आमदार थोरात हे राज्याचे सर्वमान्य नेतृत्व – देशमुख महाराज

संगमनेर । विनोद जवरे ।

अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकाने शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. देवपण येण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागत असून लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हे सर्व मान्य नेतृत्व आहे. तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार ह भ प  निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले आहे.

वेल्हाळे येथे हरी बाबा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सप्ताहाच्या सांगता प्रसंगी कारल्याच्या कीर्तनात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, रणजीत सिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत ,अजय फटांगरे, आयोजक तानाजी शिरतार, रमेश जेडगुले, व्यंकटेश महाराज सोनवणे, सौ वैजयंती ताई शिरतार कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते
यावेळी केक कापून लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, सध्या फॅशनच्या नावावर चाललेले संस्कृतीचे विद्रूपीकरण अत्यंत दुर्दैवी आहे. वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण व अपघाताचे प्रमाण ही मोठी चिंताजनक बाब असून चांगला आहार असेल तर माणूस निरोगी राहतो. याकरिता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आहारात जास्त घेतल्या पाहिजे .याचबरोबर अपघात टाळण्यासाठी व्यसन करू नये, त्याचबरोबर वेगाची मर्यादा राखावी आणि सर्वात महत्त्वाचे  मोबाईलवर बोलणे ही टाळले पाहिजे. यावेळी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या विविध बाबी लक्षात आणून देत चांगल्या सवयी, चांगली संस्कृती ,चांगला आहार यावर उपस्थित यांना प्रबोधन केले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी संगमनेरचे नाव राज्य पातळीवर दिले आहे. याप्रसंगी कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख यांनीही मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी अशोक बढे ,प्रवीण कदम ,विलास नवले, देविदास नवले, रवी नवले, वाल्मीक शिरतार यांचे सह हरीबाबा मित्र मंडळाचे विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी वेल्हाळे, मालदाड, घुलेवाडी यांसह परिसरातील भावी भक्तगण दररोज मोठ्या संख्येने उपस्थित होते..
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!