लोकनेते आ.बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
किर्तन सप्ताह, क्रिकेट स्पर्धा, रक्तदान शिबिर, व्याख्याने, शिंदेशाही बाणासह विविध कार्यक्रम
लोकनेते आ.बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
संगमनेर । विनोद जवरे ।
राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस हा संगमनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा होत असून या निमित्त कीर्तन सप्ताह, रक्तदान शिबिर, क्रिकेट स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, विविध व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा झाला.
लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेल्हाळे येथे सात दिवस कीर्तन सप्ताहाचे आयोजन, झाले तर वडगाव पान येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, करण्यात आला जोर्वे, तळेगाव, देवकौठे, पिंपरणे येथे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन झाले. तर अमृत संस्कृतीक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर यांसह सह्याद्री विद्यालयात व्याख्यानांचे आयोजन झाले तर जाणता राजा मैदानावर अलोट गर्दी च्या उपस्थितीत शिंदेशाही बाणा हा कार्यक्रम झाला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षाप्रमाणे संगमनेर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. यामध्ये आनंद शिंदे आदर्श शिंदे मिलिंद शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला शिंदे शाही बाणा हा सुमारे पंचवीस हजार नागरिकांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम संगमनेर करांसाठी संस्मरणीय ठरला. तर हरीबाबा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कीर्तन सप्ताहात राज्यातील अनेक नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन केले. यावेळी महिला व नागरिकांची उपस्थिती मोठी राहिली याचबरोबर सांगता प्रसंगी समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांनी काल्याचे किर्तन केले या कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती.
याचबरोबर जोर्वे येथे इंद्रजीत भाऊ थोरात मित्र मंडळाने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले. तर वडगाव पान येथे ७१ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार करण्यात आला. याचबरोबर पिंपरणे, देवकौठे, वडगाव पान येथे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन झाले. तर हरीबाबा मित्र मंडळ अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज व अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. अर्पण रक्तपेढीच्या विद्यमाने झालेल्या या रक्तदान शिबिरात 351 युवकांनी रक्तदान केले. याचबरोबर सह्याद्री संस्थेतील विद्यालयांमध्ये व्याख्यानांचे ही आयोजन झाले. राज्यातील सुसंस्कृत व लोकप्रिय नेतृत्व असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील 171 गावांमध्ये त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले तर त्यांच्या अभिनंदनचे होर्डिंग कार्यकर्त्यांनी गावोगावी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या याचबरोबर नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई, ठाणे,नागपूर, गोंदिया, कोल्हापूर ,रायगड, औरंगाबाद, नंदुरबार व जळगाव या ठिकाणीही आमदार थोरात यांच्या अभिनंदन कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या विविध कार्यक्रमांच्या वेळी आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
तरुणाईचे आयकॉन आ.थोरात यांची सोशल मीडियावर क्रेज
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप या सर्व माध्यमांवर आमदार थोरात यांच्या विविध छबी होत्या. याचबरोबर त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेणारे विविध चित्रफीत व अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांनी गायलेले नामदार थोरात यांच्या जीवनावरील गीते ही सर्वाधिक आकर्षण ठरले. युवकांमध्ये आमदार थोरात यांची असलेली मोठी क्रेझ यामुळे सोशल मीडियावर आमदार थोरात यांचीच धूम होती.