ब्रेकिंग

आमदार सत्यजित तांबे यांनी शपथ घेताच केली कामाला सुरुवात

पहिल्याच दिवशी जुनी पेन्शन योजनेसह शाळांना  तातडीने अनुदान देण्याची मागणी

आमदार सत्यजित तांबे यांनी शपथ घेताच केली कामाला सुरुवात

संगमनेर । विनोद जवरे ।

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी आज विधान परिषद सदस्यतेची शपथ घेतली असून पहिल्या दिवशी कामाचा धडाका सुरू करताना त्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षण मंत्र्यांची वेळ मागताना विना अनुदानित शिक्षकांना शाळा तपासणीची आठ न ठेवता तातडीने अनुदान द्यावे यांसह विविध मागण्यांचे पत्र देऊन कामाला सुरुवात केली आहे.

मुंबई येथे विधान परिषदेत सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांना विविध मागण्यांचे पत्र दिले.
गेली बावीस वर्षे समाजकारण आणि राजकारणात अत्यंत सक्रिय व युवकांमध्ये लोकप्रिय असलेले धडाकेबाज नेतृत्व म्हणून सत्यजित तांबे यांची राज्यभरातओळख आहे .नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्ताने मोठी चर्चा झाली असून या निवडणुकीतही आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील अभ्यासपूर्ण मुद्द्यांची सर्वत्र चर्चा झाली आहे.नाशिक पदवीधर मतदारसंघ हा मा.आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. डॉ. तांबे यांनी मागील तेरा वर्षे सातत्याने 54 तालुक्यात संपर्क ठेवून अत्यंत लोकाभिमुख कामे केली आहे. याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील कायम शब्द वगळण्या बरोबरच शिक्षण सेवक मानधन वाढ ,अनुदान अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यामुळे या निवडणुकीत टिडीएफ, शिक्षकभारती सह 105 विविध संघटनांनी सत्यजित तांबे यांना पदवीधर निवडणुकीत पाठिंबा दिला होता.

आमदार पदाची शपथ घेताच सत्यजित तांबे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला असून त्यांनी शालेय शिक्षण विभागाला पत्र दिले असून यामध्ये असे म्हटले आहे की,अनुदान देण्याबाबत व शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्यात बाबत निर्गमित केलेले निर्णय हे चांगले आहेत. विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देणे बाबतचा शासन निर्णय काढताना त्यामध्ये शाळांना पुन्हा तपासणीची अट घातलेली आहे. मुळातच या अगोदर देखील अनेक वेळा या शाळा, वर्ग व तुकड्यांची तपासणी झालेली असून ही अट काढून सर्वांना अनुदान सुरू करावे .तसेच शिक्षक सेवकांचे मानधन आपण वाढवले. परंतु येथून पुढे शिक्षण सेवकांची मानधनवाढ महागाई निर्देशका नुसार आपोआप व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे. याचबरोबर सर्वाधिक महत्त्वाच्या असल्या जुनी पेन्शन योजनेबाबत गांभीर्याने विचार करताना या प्रश्नाच्या चर्चेसाठी वेळ द्यावा अशी विनंती ही आ सत्यजित तांबे यांनी केली आहे.

सत्यजित तांबे यांच्या धडाकेबाज कामाच्या पद्धती मुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील विविध शिक्षक, शिक्षकेतर व शासकीय, अशासकीय कर्मचारी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!