ब्रेकिंग
ना. थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त अमृतवाहिनीच्या ३१६ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान
ना. थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त अमृतवाहिनीच्या ३१६ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान
कोपरगांव : विनोद जवरे
नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर ग्रामीण अर्थकारणाला गती मिळवून देणारे आणि संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेचे लाडके प्रतिनिधि, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री तथा अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वाढदिवसा निमित्त अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शासकीय जिल्हा रुग्णालय – रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक ७ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले असल्याची माहिती, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली.

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात दादांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. याच अनुषंगाने अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, आदरणीय साहेबांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या मध्ये राष्ट्र सेवा योजनाचे सर्व स्वयंसेवक, सर्व विभागांचे समन्वयक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ३१६ जणांनी रक्तदान केले. या वेळी अमृतवाहिनी अभियांत्रिकीचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. विलास शिंदे यांचा आजपर्यंत सलग २८ वेळेस रक्तदान केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटनाला, अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलजी शिंदे साहेब, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे व्यवस्थापक प्रा. डॉ. व्ही. बी. धुमाळ सर, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश सर, रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे सर यांची प्रमूख उपस्थिती लाभली. या रक्तदान शिबिरासाठी मेट्रो रक्तपेढी, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक चे बी.टी.ओ. डॉ. शिवाजी लहाडे, जनसंपर्क अधिकारी श्री मंगेश राठोड, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी अनिल मोरे तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रखम गव्हाणे सर, डॉ. मनोज वाकचौरे सर, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. दीपक पाटील यांच्या सहकार्याने व राष्ट्र सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी कौस्तुभ मंत्री व सर्व विभागांचे स्वयंसेवक यांच्या कार्य तत्परतेमुळे, रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले.
