अमृतवाहिनीचे डॉ. एम. ए. वेंकटेश यांना सा. फु. पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार प्रदान
अमृतवाहिनीचे डॉ. एम. ए. वेंकटेश यांना सा. फु. पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार प्रदान
संगमनेर । विनोद जवरे ।
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. एम.ए.वेंकटेश यांनी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असताना विविध, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. महाविद्यालयात उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करून शंभर टक्के प्रवेश, उत्कृष्ट निकाल, जर्मन व जपानी कोर्सेसची व्यवस्था या बाबींमुळे शंभर टक्के प्लेसमेंट याबरोबरच आंतरराष्ट्रीय जपान टोकियो येथे विद्यार्थ्यांची यशस्वी प्लेसमेंट झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात नवनवीन तुर्यांची भर पडत आहे. यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेत अधिकाधिक भर होऊन नेक ए प्लस ग्रेड (4 पैकी 3.4 एवढा CGPA) मिळवण्यात महाविद्यालयाने कामगिरी केली, तसेच इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागांचे एन बी ए चे मानांकन मिळवले. यापूर्वी महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज अवार्ड (2020-21) डॉक्टर व्यंकटेश यांच्याच कार्यकाळात मिळालेला आहे. महाविद्यालयाला कायम संलग्नता प्राप्त करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या उपक्रमात महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे. यामध्ये वेगवेगळ्या वर्षाचे कॅप (उत्तरपत्रिका तपासणी केंद्र), विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यशाळा, एन एस एस तर्फे आयोजित केलेले उपक्रम यामध्ये भरीव सहभाग महाविद्यालयाने ठेवला आहे.
त्यांच्या प्राचार्य कार्याचा गौरव म्हणून व्यंकटेश यांना आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापनदिन सोहळ्यात भारत सरकार नीती आयोगाचे अध्यक्ष पद्मश्री भिकुजी इदाते यांच्या हस्ते बेस्ट प्रिन्सिपल पुरस्काराने गौरवण्यात आले, यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक कारभारी काळे, प्र. कुलगुरू संजीव सोनवणे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सुनेत्राताई पवार, अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित होते आणि डॉ. व्यंकटेश यांनी सपत्नीक पुरस्कार स्वीकारला. यावेळी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विभागप्रमुखसह, प्रतिनिधी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. एम ए वेंकटेश यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त मा. आमदार डॉ. सुधीरजी तांबे, विश्वस्त इंद्रजीतभाऊ थोरात, विश्वस्त शरयूताई देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले आहे.