आज आमदार बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर
आज आमदार बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर
संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना झालेल्या दुखापती नंतर सुमारे एक महिन्याच्या कालावधीनंतर ते आज सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान दुखापत झाली होती. खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ते दीड महिना संगमनेर मध्ये आले नव्हते. राजकीय कारकीर्दीमध्ये प्रथमच इतक्या दिवसांनी संगमनेर मध्ये ते आले नाहीत. दुखापती नंतर शिंदेशाही बाणा या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने जनतेशी संवाद साधला होता मात्र प्रत्यक्षात दुखापती नंतर संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सोमवार दुपारी 4 वाजता यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे ते सर्व कार्यकर्त्यांना भेटणार असून यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांची संवाद ही साधणार आहे.
तरी दुपारी 4 वाजता यशोधन कार्यालय येथे संगमनेर तालुक्यातील विविध कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.