ब्रेकिंग

शिक्षण क्षेत्रातील नवीन बदल आत्मसात करणे गरजेचे – मा. आ. डॉ. तांबे

शिक्षण क्षेत्रातील नवीन बदल आत्मसात करणे गरजेचे – मा. आ. डॉ. तांबे

 

संगमनेर । विनोद जवरे ।

शिक्षण हे समाज विकास व समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून आधुनिक, जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण क्षेत्रात जे नवीन बदल होत आहे त्याचा स्वीकार करणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन मा. आमदार डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर, प्राचार्य डॉ. अनुश्री खैरे, प्राचार्य डॉ. सुभाष कडलक, उपप्राचार्य डॉ, बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, डॉ. सुहास आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील पारंपारिक दृष्टिकोन बाजूला ठेवून शिक्षण क्षेत्रातील नवीन बदलांचा स्वीकार विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी केला पाहिजे. त्यासाठी सरकारने शिक्षण क्षेत्रावर होणार्‍या खर्चात वाढ केली पाहिजे तरच आपल्याला अपेक्षित उद्दिष्दष्ट्यो साध्य करता येतील याचबरोबर संशोधन क्षेत्रात देखील मोठी संधी आहे. त्यासाठी सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. खेडेकर मार्गदर्शन करताना म्हणाले कि, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. या धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाची उद्ष्ट्यिो साध्य करताना सरकार, शैक्षणिक संस्था ,प्राध्यापक यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी हे धोरण समजून घेऊन त्याविषयी सकारात्मकता तयार करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.


यावेळी प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी आणि त्या धोरणापुढील आव्हाने या विषयी मार्गदर्शन केले या कार्यशाळेच्या दुपारच्या तांत्रिक सत्रात डॉ. अलोरी नागावर्मा यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयी मार्गदर्शन करताना या धोरणाची अंमलबजावणी करत असताना शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि संसाधने यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले.या सत्राचे अध्यक्षस्थान प्राध्यापक तुळशीराम जाधव यांनी भूषवले दुसर्‍या सत्रामध्ये शिक्षण त-ा डॉ. भाऊसाहेब चासकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी विकास यावर भर देताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी अस्मिता निर्माण करण्यासाठीची शिक्षण व्यवस्था निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी संवाद हा प्रभावी माध्यम असून त्यासाठी विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मतही त्यांनी मांडले या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दिनानाथ पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. लक्ष्मण घायवट यांनी मानले. र्काक्रमाचे  सूत्रसंचालन डॉ. स्वाती ठुबे, प्रा. एम एस काशीद व प्रा. कोमल म्हस्के यांनी केले. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, पत्रकार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!