परशराम साबळे यांचा आंतरराष्ट्रीय लॉर्ड बुद्धा पुरस्काराने गौरव
परशराम साबळे यांचा आंतरराष्ट्रीय लॉर्ड बुद्धा पुरस्काराने गौरव
कोपरगांव । विनोद जवरे ।
ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांचा समता साहित्य अकॅडमीच्या वतीने आशिया खंडातील नामांकित असा आंतरराष्ट्रीय लॉर्ड बुद्धा गोल्डन पुरस्काराने बंगळुरू येथे सन्मानित करण्यात आले असून या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे साबळे यांच्या रूपाने कोपरगावत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे परंतु घरची परिस्थिती हलकीचे असताना देखील आपल्या स्वतःच्या जिद्दीवरून हिमतीवर छोटा-मोठा काम धंदा करत आपले शिक्षण पूर्ण करत २००५ साली समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींना उच्च प्रतीचे व्यावसायिक शिक्षण मिळावे या उद्देशाने कोपरगावत ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करत भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची मान्यता घेत अनेक छोटे-मोठे व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू करत अनेक मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिक्षणासोबतच मानसिक पाठबळ देत अनेक मुला-मुलींची भवितव्य उज्वल केले असून आज रोजी संस्थेचे हजारों विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असून अनेकांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे तर अनेक विद्यार्थी परदेशात नोकरीस आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळावे या उद्देशाने कासली येथे स्थापन केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून देखील अनेक गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींना उच्च प्रतीचे शिक्षण अत्यंत माफक फी मध्ये मिळत आहे. तसेच कोरोना काळात देखील साबळे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत कोरोना जनजागृती करत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले त्यासोबतच कोरोनामध्ये अनेक गरजूना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. सामान्य कुटुंबातील साबळे यांना या आदी देखील आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
साबळे यांच्या याच कार्याची दखल घेत नुकतेच बंगळूर येथे संपन्न झालेल्या समता साहित्य अकॅडमीच्या १५ व्या राष्ट्रीय अधिवेशनात पद्मश्री अगुस इंद्रा यांच्या शुभहस्ते तसेच समता साहित्य अकॅडमी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ योगी देवराज गुरुजी, राष्ट्रीय योग विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ आरुलमा गुरुजी, डॉ सुरेश नरपानी, तमिळनाडू रिसर्च फाउंडेशनचे प्रमुख तांडेकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साबळे यांना गौरवण्यात आले.
साबळे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टार बापूसाहेब डांगे, सातभाई ज्युनिअर कॉलेजचे प्रा विशाल धरणगावकर, निलेश देवकर, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रा विजय जाधव, विलास चव्हाण, राजेंद्र आहेर, सोनाली कापसे, रेखा दिवे आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.