सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार उल्हासदादा पवार यांना तर डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूहास जाहीर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार उल्हासदादा पवार यांना तर डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूहास जाहीर
संगमनेर । विनोद जवरे ।
कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूह, जळगांव यांना तर सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक माजी आमदार उल्हासदादा पवार यांना जाहीर झाला असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे निमंत्रक आ.डॉ.सुधीर तांबे व डॉ. राजीव शिंदे यांनी दिली आहे.
स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमीत्त पुरस्काराविषयी माहिती देतांना आ.डॉ.तांबे व राजीव शिंदे म्हणाले कि, दरवर्षी कृषी , शिक्षण, साहित्य, संशोधन, सहकार, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विविध मान्यवरांना जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने शानदार कार्यक्रमात या रायस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येते.
कृषी, संशोधन, शिक्षण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यावर्षीचा कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूह, जळगांव यांना जाहीर झाला आहे.जळगांव येथे जैन उद्योग समूहाने शेतकर्यांच्या जिवनात आनंद निर्माण करतांना कृषीतंत्र-ाान, जैवतंत्र-ाान, ठिबक सिंचन,अन्न व फळ प्रक्रिया या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. तसेच जळगांव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जीवनकार्यावरील पहिले ऑडीओ गाईडेड म्युझियम गांधी तीर्थ निर्माण केले आहे. तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते असलेल्या येष्ठ नेते मा. आ. उल्हास दादा पवार यांनी संत साहित्य, संगीत, समाजकारण, सहकार, पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांना स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांर्थींची निवड कृषी भूषण विजय अण्णा बोर्हाडे, उल्हास लाटकर, डॉ. राजीव शिंदे, उत्कर्षाताई रुपवते, केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात यांच्या निवड समितीने केली आहे.
काँग्रेसचे वरीष्ठ नेते व माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भव्य कार्यक्रमात रायातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मा.आ.उल्हास दादा पवार, जैन उद्योग समूहाला गौरविण्यात येणार आहेत. यावेळी वैचारिक प्रबोधनासह दर्जेदार सांस्कृतीक कार्यक्रमांचे ही आयोजन केले जाणार आहे.