ब्रेकिंग

मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात तालुक्याच्या विकासाचा वेग राखणार – आमदार सत्यजित तांबे

जाहिरात -7756405359
मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात तालुक्याच्या विकासाचा वेग राखणार – आमदार सत्यजित तांबे

चिकणी येथे 57 लाख रुपये निधीतील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्याला विकासाची आणि सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक गावात विकासासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी दिला आहे. तालुक्यात आणि शहरात मोठमोठी विकास कामे मार्गी लागली आहे. राज्यामध्ये कुठेही गेला तरी संगमनेरकर म्हणून प्रत्येक जण अभिमानाने सांगतो हे एका दिवसाचे काम नाही. अनेक दिवसांच्या परिश्रमातून हा लौकिक निर्माण झाला असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात यापुढेही तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

चिकणी येथे 57 लाख रुपये निधीतील विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रामहरी कातोरे, अजय फटांगरे, कॉम्रेड कारभारी उगले, विलास वर्पे, भारत वर्पे,मोहनराव करंजकर,भारत शेलकर, शेतकरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, रमेश वर्पे,दर्शन वर्पे, सचिन वर्पे, प्रशांत वर्पे, पंकज हासे, संदीप वर्पे, राहुल मुटकुळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते यावेळी भागवत बाबा मंदिर परिसर सुशोभीकरण, जिल्हा परिषद शाळा खोली व पशुवैद्यकीय दवाखाना संरक्षण भिंत बांधकाम या कामांचा लोकार्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या कायमस्वरूपी पाण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. आज दोन्ही कालव्यांमधून पाणी सुरू आहे. मागील 40 वर्षात स्वतःच्या कामांमधून हा तालुका उभा केला गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या. प्रत्येक माणसाला सन्मान मिळून दिला. संगमनेर म्हटलं की चांगली माणसं हा लौकिक निर्माण झालेला आहे.कोणतेही काम एका दिवसात होत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात. आपल्या सर्वांना विचारांची आणि संस्कृत राजकारणाची परंपरा आहे. राजकारण हे गोरगरिबांच्या विकासासाठी करायचे असते हे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संस्कार आपल्या सर्वांना दिली आहेत. चिकणी मध्ये अनेक विकास कामे केली आहेत. यादी काढली तर खूप मोठी होईल. आणि हे गावातील सर्व जनतेला माहित आहे. यापुढील काळातही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकासाचा वेग कायम राखले जाईल असे ते म्हणाले.

तर रामहरी कातोरे म्हणाले की, प्रत्येक गावामध्ये माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत. तालुक्यासाठी निळवंडे धरण विविध वैभवशाली इमारती गावोगावी रस्त्यांचे जाळे बंधाऱ्यांचे जाळे असे अनेक कामे सांगता येतील. तरुणांना विनंती आहे की काही मंडळी जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरत आहे.त्याला बळी पडू नका.तर कॉम्रेड कारभारी उगले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श संस्कारातून आणि शिस्तीमधून हा तालुका घडला आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या तालुक्याचे नेतृत्व करताना प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण केला. सत्ता येते आणि जाते मात्र लोकनेता कायम जनतेत असतो. हा काळ लवकर बदलेल. सर्वांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी कायम उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.तर आनंद वर्पे म्हणाले की, आता तरुण पिढी भाजपच्या विरोधात उभी राहिली आहे. धर्मपंथ, यापेक्षा बेरोजगारी, महागाई, नोकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, कर्जमाफी यावर सरकारने बोलले पाहिजे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप थोरात यांनी केले तर भारत वर्पे यांनी आभार मानले. यावेळी गावातील महिला युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!