कै. भिमाबाई पोपट थोरात यांचे प्रथम पुण्यस्मरण; जवळके येथे रविवारी वर्षश्राद्ध कार्यक्रम

कै. भिमाबाई पोपट थोरात यांचे प्रथम पुण्यस्मरण; जवळके येथे रविवारी वर्षश्राद्ध कार्यक्रम

हरी कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; ह.भ.प. दिगंबरजी महाराज नाशिककर यांची कीर्तनसेवा
जवळके । प्रतिनिधी । जवळके (ता. कोपरगाव) येथील कै. सौ. भिमाबाई पोपट थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गावातील मारुती मंदिर येथे सकाळी १० वाजता वर्षश्राद्ध कार्यक्रम होणार असून, ह.भ.प. दिगंबरजी महाराज नाशिककर यांची हरी कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे.

कै. भिमाबाई थोरात या कुटुंबातील प्रेमळ, कष्टाळू आणि संस्कारशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी थोरात-पाटील परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत धार्मिक वातावरणात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.या कार्यक्रमास नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त थोरात-पाटील परिवार व आष्टे, जवळके परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



