ब्रेकिंग

कोपरगावात ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव सुरु

कोपरगावात ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव सुरु

‘दिवाळी हाट’मधून स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन द्या- सौ.पुष्पाताई काळे

कोपरगांव । प्रतिनिधी । स्थानिक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावे, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळीच्या खाद्यपदार्थांना व विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच नागरिकांना दिवाळी सणाच्या आवश्यक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात सालाबादप्रमाणे याहीवर्षी ‘दिवाळी हाट’चे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या दिवाळी हाटला आवर्जून भेट देऊन स्थानिक व्यावसायिक व महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा तथा गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी केले.

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. दिवाळी हाट ही याच उपक्रमाचा एक भाग आहे. कोपरगावकरांना दिवाळीची खरेदी सोयीस्करपणे करता यावी या उद्देशातून मागील काही वर्षापासून दिवाळीच्या खरेदीसाठी ‘दिवाळी हाट’ हा खरेदी महोत्सव सुरु करण्यात आला आहे. याहीवर्षी शनिवार (दि.२४) पासून सोमवार (दि.२६) पर्यंत तीन दिवस हा ‘दिवाळी हाट’ हा खरेदी महोत्सव सुरु झाला असून गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते या ‘दिवाळी हाट’ चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नागरिकांना मनासारख्या वस्तू माफक दरात मिळत असल्याने या ‘दिवाळी हाट’ला नागरिकांची पसंती मिळत आहे. ‘दिवाळी हाट’ च्या माध्यमातून कोपरगाव शहरात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. या महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होवून दरवर्षी या दिवाळी हाटला कोपरगावकरांचा मोठा प्रतिसाद मिळतो त्यामुळे बचत गटाच्या महिलांची व इतर व्यावसायिक महिलांची दिवाळी गोड होत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या नेत्राताई कुलकर्णी, रमाताई पहाडे, गटनेत्या गौरीताई पहाडे, नगरसेविका माधवीताई वाकचौरे, निर्मलाताई आढाव, सोनालीताई कपिले, स्मिताताई साबळे, सोनमताई त्रिभुवन, स्वप्नजाताई वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला व नागरिक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व स्टॉल धारक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!