ब्रेकिंग

नाथभक्ती गीतांमुळे अध्यात्माचा जागर – डॉ. जयश्रीताई थोरात

अलख निरंजन च्या गजराने दुमदुमले कोकणगाव

जाहिरात -7756405359
नाथभक्ती गीतांमुळे अध्यात्माचा जागर – डॉ. जयश्रीताई थोरात

अलख निरंजन च्या गजराने दुमदुमले कोकणगाव
 संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्याला सहकार सततच्या विकासाबरोबर साहित्य कला आणि अध्यात्माची मोठी परंपरा आहे . वारकरी संप्रदायाची मानवतेची शिकवण पुढे नेणारे आपण सर्व पाईक असून नाथ भक्ती गीतांच्या माध्यमातून अध्यात्माचा मोठा जागर होत असल्याचे प्रतिपादन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले असून अलख निरंजन व नात गीतांनी कोकणगाव परिसर दुमदुमून गेला.

कोकणगाव येथे नाथ शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने तुळजाई माता मंदिर परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक चंदन कांबळे ,नाथपंथीय गायक आकाश शिंदे व मनोज बेल्हेकर यांच्या विशेष भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर डॉ. जयश्रीताई थोरात, गौतम बाबा दिघे, शरद नाना थोरात ,खंडू सातपुते ,संतोष वायकर, सरपंच आशाताई जोंधळे, आयोजक कल्पेश चौधरी, चैतन्य जोंधळे, सुदर्शन पारधी, विवेक सोनवणे, गोकुळ जोंधळे आदी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रम सुरू होताच चंदन कांबळे यांनी आलेख निरंजन ही हाक देतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तर आकाश शिंदे यांनी गायलेल्या नाथ गीतांना युवकांनी भरभरून दाद दिली. मनोज बेलेकर यांनी गायलेले गीतेही दुसरा महिला व पुरुषांची मोठी उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात नाथ गीतांच्या गजराने परिसर भक्तीमय झाला होता.

यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून या परिसराच्या सुशोभीकरणा निधी मिळाला असून हे मंदिर अध्यात्माचे मोठे केंद्र ठरले आहे नातं प्रतिष्ठानने नात गीतांचा कार्यक्रम आयोजित करून अध्यात्माचा जागर केला आहे.वारकरी संप्रदायाने मानवतेचा मंत्र दिला आहे. राज्यघटना समानता आणि मानवता हे सर्वांसाठी महत्त्वाचा असून युवकांनी जातीभेदाला महत्त्व न देता मानवतेचा विचार पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे. जातिपातीचे राजकारण हे सोपे राजकारण आहे मात्र सातत्याने विकास कामे करणे हे अवघड राजकारण आहे. आपण सर्वांनी संत परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांची मानवतेची शिकवण अधिक जपूया असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश चौधरी यांनी केले तर चैतन्य जोंधळे यांनी आभार मानले. यावेळी कोकणगाव व परिसरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!