ब्रेकिंग

श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

आपले नगर
_____________
कोपरगाव :- विनोद जवरे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ च्या परीक्षेत श्री गुरुदत्त इंग्लिश स्कूल शिरसगाव शाळेच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त केले आहे सदर परीक्षेत शाळेतील इयत्ता ८ वीच्या वर्गातील एकूण २२ विद्यार्थी बसले होते

त्यापैकी ऋतुजा शेटे (१८८), भाग्यश्री शिंदे (१८४) , गौरव पगारे (१७४) , आदित्य भागवत ( १७०) ,रोहन शेटे ( १६८) व प्रशांत आगवन ( १६२) असे ६ विद्यार्थी विशेष प्रावीण्य गुण मिळवून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले सदर वर्गातील एकूण २२ पैकी सर्व विद्यार्थी पास होऊन इयत्ता ८ वी चा निकाल १००% लागला. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ मध्ये शाळेतील इयत्ता ५ वी चे विद्यार्थी आदित्य दाभाडे ( २२२) , ईश्वरी खटकाळे ( २१४) , साई घायवट (२१२) , समीक्षा साळवे ( २०४) व मितूशा धट ( २००) असे ५ विद्यार्थी विशेष प्रावीण्य गुण मिळवून उत्तीर्ण झाले.इयत्ता ५ वी च्या एकूण २९ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७५% निकाल लागला. संस्थेचे संस्थापक श्री केशवराव भवर साहेब , संचालक श्री.स्वप्नील भवर सर, मुख्याध्यापक श्री. दिपक चौधरी सर यांनी सदर यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . सदर विद्यार्थ्याच्या यशामागे शाळेतील शिक्षक श्री मलिक सर, श्रीमती अभंग मॅडम, श्री चव्हाण सर , श्री काळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!