जिल्ह्यात सर्वौच्च भाव देणारा कारखाना म्हणून डॉ.विखे पाटील कारखाना प्रथम क्रमांकावर

जिल्ह्यात सर्वौच्च भाव देणारा कारखाना म्हणून डॉ.विखे पाटील कारखाना प्रथम क्रमांकावर
जिल्ह्यात सर्वौच्च भाव देणारा कारखाना म्हणून डॉ.विखे पाटील कारखाना प्रथम क्रमांकावर
लोणी । प्रतिनिधी । अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत असलेल्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ च्या ७५ व्या गळीत हंगामाची सांगता बुधवार दि. २ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वा. कारखाना कार्यस्थळावरील डॉ.धनजंयराव गाडगीळ सभागृहात आयोजित केला असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी दिली.

जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या ७५ व्या अमृत महोत्सवी गळीत हंगाम सांगता समारंभा प्रसंगी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, प्रवरा सहकारी बॅकेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे पाटील, ट्रक सोसायटीचे चेअरमन जग्गनाथ राठी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्षा सौ.गिताताई थेटे, प्रवरा बॅकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, व्हा.चेअरमन सुनिल जाधव यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थितीत संपन्न होणार आहेत.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल पुर्ण केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांचे हित जोपासतानाच सहकारी साखर कारखानदारी टिकून राहावी म्हणून अनेक आव्हानांवर मात करुन आजपर्यंतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी करुन दाखविले आहेत. ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या व्यवस्थापनातून कारखान्याने प्रगती साध्य केली. जिल्ह्यात आज सर्वौच्च भाव देणारा कारखाना म्हणून डॉ.विखे पाटील कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. यंदाचे वर्ष हे अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे होत असताना कारखान्याचा ७५ वा गळीत हंगाम संपन्न व्हावा हा सुध्दा मोठा योगायोग असल्याचे कैलास तांबे यांनी सांगितले.तरी या ७५ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभासाठी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.