बाळासाहेब गव्हाणे व मित्र परिवाराचे कार्य कौतुकास्पद- महंत रमेशगिरीजी महाराज
३०० महिला मोफत देवदर्शनासाठी रवाना

बाळासाहेब गव्हाणे व मित्र परिवाराचे कार्य कौतुकास्पद- महंत रमेशगिरीजी महाराज
बाळासाहेब गव्हाणे व मित्र परिवाराचे कार्य कौतुकास्पद- महंत रमेशगिरीजी महाराज
३०० महिला मोफत देवदर्शनासाठी रवाना
कोपरगाव । विनोद जवरे ।
नेहमीच सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्यात आग्रेसर असणारे तालुक्यातील अंजनापूरचे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित असलेले बाळासाहेब यशवंत गव्हाणे व मित्रपरिवाराच्या वतीने अंजनापुर गावातील महिलांना तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी,मोरगावचा गणपती, थेऊरचा गणपती, श्री क्षेत्र संभाजी महाराज समाधी स्थान तुळापूर व आळंदी दर्शन घडविले असून या दर्शम यात्रेचे प्रस्थान मंगळवार दि १ एप्रिल रोजी श्री संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून झाले.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने सामाजिक भावनेतून मी हे उपक्रम राबवत असून महाराजांच्या आशीर्वादाने या पुढे देखील असेच उपक्रम राबवत समाजाची निरंतर सेवा करणार.
बाळासाहेब गव्हाणे
आरोग्यदूत अंजनापूर
आरोग्यदूत म्हणून सर्वपरिचित असलेले बाळासाहेब गव्हाणे व मित्रपरिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो या आदी त्यांनी आजोबांच्या स्मरणार्थ क्रिकेटप्रेमी साठी क्रिकेट स्पर्धा, शिवजयंती निमित्त ४०० शिवभक्तांना शिवनेरी दर्शन, मोफत आरोग्य शिबिरात ८०० हुन अधिक गरजूंची तपासणी करत य ४०० हून अधिक गरजूंना स्व:खर्चाने नंबरच्या चष्म्याचे वाटप, परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोफत रक्त तपासणी केली. शाळेला संगणक भेट देत प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करत हुशार विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप केली अशा एक ना अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यात आग्रेसर असणारे गव्हाणे यांनी गावातील महिलांसाठी ही मोफत दोन दिवसीय देवदर्शन यात्रा आयोजित केली असून या यात्रेत ३०० च्या आसपास महिलांना सहभाग घेतला असून या सर्व महिलांची राहण्याची जेवणाची देखील सोय केली आहे तर मुकामाच्या दिवशी त्या ठिकाणी ह.भ.प भास्कर महाराज गव्हाणे यांचे प्रवचन होणार आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी महंत रमेशगिरीजी महाराज यांनी सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा शुभाशीर्वाद देत बाळासाहेब गव्हाणे व त्यांचा मित्र परिवार गेल्या अनेक वर्षांपासून गावातील सर्वांसाठी करत असलेल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत त्यांचा हातून असेच समाजपयोगी उपक्रम यापुढे देखील घडत राहो असे सांगत महाराजांनी आरोग्यदूत गव्हाने यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
