ब्रेकिंग
काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य किर्तन महोत्सव
काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य किर्तन महोत्सव
संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त वेल्हाळे परिसरातील हरीबाबा देवस्थान येथे दिनांक 31 जानेवारी 2023 ते 7 फेब्रुवारी 2023 या काळात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तानाजी शिरतार यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तानाजी शिरतार म्हणाले की, आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
याबाबत अधिक माहिती देताना तानाजी शिरतार म्हणाले की, आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

हरीबाबा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी जंगी कुस्त्यांचे आयोजन होत असून यावर्षी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सायं. 7 ते 9 वा. ह.भ.प आरतीताई दिघे यांचे किर्तन होणार असून दिनांक 01 फेब्रवारी 2023 रोजी भागवताचार्य ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील, दिनांक 02 फेब्रवारी 2023 रोजी ह.भ.प विशाल महाराज खोले , दिनांक 03 फेब्रवारी 2023 रोजी ह.भ.प समाधान महाराज भोजेकर, दिनांक 04 फेब्रवारी 2023 रोजी ह.भ.प अनिल महाराज तुपे, दिनांक 05 फेब्रवारी 2023 रोजी ह.भ.प सागर महाराज बोराटे , दिनांक 06 फेब्रवारी 2023 ह.भ.प महंत रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे हरिकिर्तन होणार आहे. मंगळवार दिं. 7 फेब्रवारी 2023 रोजी स.10 वा.समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) यांचे काल्याचे किर्तन होणार आहेत.

तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तानाजी शिरतार,हरिबाबा तरुण मित्र मंडळ यांनी केले आहे.