चासनळी येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
चासनळी येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य या विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा 2023 साठी शुभेच्छा समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. श्री. सुजित दादा रोहमारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष भाऊ जाधव हे उपस्थित होते. तसेच अण्णाभाऊ फरताळे हे ही उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय .श्री. बारे. एन.जी. यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात महाविद्यालयाने शंभर टक्के निकाल दिलेला आहे याही वर्षी आम्ही आमच्या महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के ठेवू. आमच्या संस्थेने गुणवत्ता हाच आमचा मानस आहे असे मानून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव रोहमारे साहेब यांचा उद्देश आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. आपल्या प्रमुख पाहुणे भाषणात माननीय श्री संतोष भाऊ जाधव यांनी सांगितलेकी,” विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आध्यात्मिक वारसा जपावा आणि आपली संस्कृती जतन करावी”. परीक्षा ही संकट नसून भविष्याची नवीन संधी आहे; असे त्यांनी यावेळी सांगितले.आपल्या आयुष्यात खरं प्रेम करणारे आपले आई-वडील शिक्षक हे आपलं आदराचं स्थान असलं पाहिजे. जीवनात भरपूर प्रलोभन येतील पण योग्य मार्ग सोडू नका असे यावेळी ते म्हणाले. आपले अध्यक्ष भाषणात माननीय श्री सुजित दादा रोहमारे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांना आधार देणारा वटवृक्ष म्हणजे शिक्षण म्हणून भविष्याची पावलं ओळखून शिक्षणाकडे लक्ष द्या व आमच्या संस्थेतून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची नेहमीच आम्ही अपेक्षा करतो त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो असेही त्यावेळी ते म्हणाले आपल्या शिक्षक मनोगतात प्राध्यापक ढेकळे सर म्हणाले की, के. बी .रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळीतील सर्व विद्यार्थ्यांना आम्ही करियर विषयी माहिती देत असतो आणि मार्गदर्शनही करत असतो असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रम वेळी इयत्ता बारावी वर्गातील कु.प्रीती सानप, कु. पारखे गायत्री, कु. गाढे अंजली तसेच चांदगुडे रितेश शेळके विराज या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रा. ढेकळे सर प्रा. रणधीर सर प्रा.पवार सर प्रा. कहार सर प्रा. वैराळ सर प्रा. आदमाने सर श्री. कोकाटे आर.पी. प्राध्यापिका.शेलार. जे. एस. प्राध्यापिका गुजर पी. एस. हे सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रौंदाळे वैष्णवी बाळासाहेब या विद्यार्थिनींनी केले तर या कार्यक्रमाच्या आभार प्राध्यापक रणधीर सर यांनी मानले.