ब्रेकिंग

मुलाचा वाढदिवसाचा खर्च टाळत शुक्राचार्य मंदिरास प-हे परिवाराकडून पाणी फिल्टर मशीन भेट

मुलाचा वाढदिवसाचा खर्च टाळत शुक्राचार्य मंदिरास प-हे परिवाराकडून पाणी फिल्टर मशीन भेट

मुलाचा वाढदिवसाचा खर्च टाळत शुक्राचार्य मंदिरास प-हे परिवाराकडून पाणी फिल्टर मशीन भेट

कोपरगाव । प्रतिनिधी ।

कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीकिनारी बेट भागात असलेल्या जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पहावा लागत नाही असे जगातील एकमेव परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचे अत्यंत पुरातन असे मंदिर असून या मंदिरात नेहमीच महाराष्ट्रसह देश-विदेशातील भाविक भक्तांचा मोठा ओघ सुरू असतो या सर्व भाविक भक्तांची व मंदिर परिसराची परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य विकासात्मक दृष्टिकोन बाळगत कार्य करत असतात तसेच वेगवेगळ्या माध्यमातून या पुरातन मंदिराचा प्रचार प्रसार सर्व दूर करण्यासाठी प्रयत्नशील असतातच त्यासोबतच मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी ट्रस्ट माध्यमातून तसेच वैयक्तिकरित्या देखील सर्वात पुढे असतात असेच एक उदाहरण परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचे मंदिर उपप्रमुख प्रसाद प-हे यांनी आपल्या कार्यातून नुकतेच सिद्ध केले आहे.


सविस्तर वृत्त असे की, परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचे मंदिरउपप्रमुख तथा कोपरगावातील प्रसिद्ध व्यवसायिक नियमित सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रसाद प-हे यांनी त्यांचा मोठा मुलगा शुभम प्रसाद प-हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनावश्यक खर्च टाळत बेट भागातील परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टला अत्याधुनिक असे स्वयंचलित कमर्शियल पाणी फिल्टर मशीन म्हणजे आरओ भेट म्हणून दिले आहे.सध्याच्या पिढी मध्ये लहान मोठ्याचे वाढदिवस साजरे करणे की एक जणू फॅशनच झाली असून या दिवशी प्रत्येक जण आपापल्या बजट नुसार खर्च करत वाढदिवस साजरे करत आनंद घेत असतो यात अनेकजण काहीतरी सामाजिक कार्य करत वाढदिवस साजरे करतात असेच एक उदाहरण बेट येथील प्रसाद प-हे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळत शहरातील मंदिरासमोर असलेल्या भिक्षुकांना थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने ब्लॅंकेटचे वाटप करत तसेच परम सद्गुरु शुक्राचार्य मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना शुद्ध पाणी मिळावे पाणी फिल्टर मशीन भेट म्हणून दिल्याने संपूर्ण शुक्राचार्य मंदिराच्या पदाधिकारी सदस्यांनी तसेच भाविक भक्तांनी प-हे परिवाराने केलेल्या या विधायक उपक्रमाचे कौतुक करत शुभम प्रसाद प-हे ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!