ब्रेकिंग

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून आदिवासी चिमुकल्यांना मायेची उब!

एकविरा फाउंडेशन व बीएसटी आर्मीच्या वतीने ३०० विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून आदिवासी चिमुकल्यांना मायेची उब!
एकविरा फाउंडेशन व बीएसटी आर्मीच्या वतीने ३०० विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप
संगमनेर । प्रतिनिधी ।  राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजातील गोरगरीब, वंचित आणि दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जपलेली सामाजिक सेवेची परंपरा डॉ. जयश्रीताई थोरात पुढे नेत आहेत. याच भावनेतून त्यांच्या पुढाकाराने एकविरा फाउंडेशन आणि बीएसटी आर्मीच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील आदिवासी व मागासवर्गीय वस्त्यांमधील जिल्हा परिषद शाळांतील ३०० विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप करण्यात आले. थंडीच्या दिवसांत या चिमुकल्यांना स्वेटरच्या माध्यमातून मायेची ऊब मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील आनंदवाडी, जावळे वस्ती, ठाकरवाडी, सावरगाव तळ येथील गाडेवस्ती, सतीची वाडी, डोळासणे येथील डुबे वाडी, खैरेदरा आणि गिरेवाडी या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. एकविरा फाउंडेशन व विदेशात कार्यरत असलेल्या बीएसटी आर्मीच्या सदस्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.
यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ, यशोधन कार्यालयातील शर्मिला हांडे, ज्योती थोरात, श्रद्धा कढणे, वंदना राहणे, उज्ज्वला राहणे, प्राजक्ता घुले, वंदना शर्माळे, हर्षल काकड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, पालक व नागरिक उपस्थित होते.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणासह विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच सामाजिक बांधिलकीतून बीएसटी आर्मीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. नवीन स्वेटर मिळाल्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद हा या उपक्रमाचा खरा आनंद ठरला.यावेळी बोलताना आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेले सामाजिक सेवेचे संस्कार लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जपले आहेत. त्याच विचारांचा वारसा डॉ. जयश्रीताई थोरात पुढे नेत असून त्या गोरगरीब आणि आदिवासी समाजाच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहेत. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हे कोणत्याही पैशात मोजता येणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातूनच आदिवासी आणि गोरगरीब समाजाची प्रगती शक्य आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि समाजात खऱ्या अर्थाने आनंद निर्माण होतो. हा अत्यंत पुण्याचा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.बाळकृष्ण गांडाळ म्हणाले की, आदिवासी आणि गोरगरीब समाजातील नागरिकांनी कायमच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनीही आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे हक्काचे नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. यशोधन कार्यालयाच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शर्मिला हांडे यांनी केले, तर ज्योती थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!