ब्रेकिंग

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा गाजवण्यासाठी गौतमच्या मुलींचा संघ चिपळूणला रवाना

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा गाजवण्यासाठी गौतमच्या मुलींचा संघ चिपळूणला रवाना

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा गाजवण्यासाठी गौतमच्या मुलींचा संघ चिपळूणला रवाना

कोपरगांव । प्रतिनिधी । क्रीडा क्षेत्रात दबदबा असणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या हॉलीबॉल संघाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत शाळेचा संघ प्रथमच पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार असून, १२ खेळाडूंचा हा संघ प्रशिक्षक राजेंद्र आढाव व इसाक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी झळाळी मिळाली आहे.राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या गौतम पब्लिक स्कूलच्या संघातील खेळाडूंमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कु. कल्याणी वावधने, कु.श्रावणी अकोलकर व कु.राजलक्ष्मी निर्मळ,अहिल्यानगर जिल्ह्यातील कु.शिवस्वरा आढाव, तसेच नाशिक जिल्ह्यातील कु.अनुष्का पवार, कु.तेजस्विनी ढोणे, कु.गौरी रायते, कु.प्रज्ञा रायते, कु.आराध्या भागवत, कु.स्नेहा देवरे, कु.स्नेहल कुरणे व कु.सायली शिंदे यांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा आणि पुणे विभागाचा नावलौकिक वाढवावा अशा शब्दात प्राचार्य नूर शेख यांनी संस्थेच्या वतीने खेळाडू व प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, गौतम पब्लिक स्कूलमध्ये बुधवार (दि.२८) पासून शालेय विभागीय हॉकी स्पर्धेलाही सुरुवात झाली आहे. प्राचार्य नूर शेख व सोलापूरचे माजी क्रीडा मार्गदर्शक जरार कुरेशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत अहिल्यानगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी झाले असून, गौतम पब्लिक स्कूलचे १४ व १७ वर्षांखालील मुलांचे हॉकी संघही मैदानात उतरले आहेत. बुधवार (दि.२८) रोजी गौतम पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या विभागीय १४ वर्षा खालील मुलांच्या हॉकी स्पर्धेमध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा ५-० गोल ने पराभव करून बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत गौतमचा संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेवेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी विशाल गर्जे उपस्थित होते. उद्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या विभागीय हॉकी स्पर्धा होणार आहेत.शाळेच्या क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात असून, प्राचार्य नूर शेख यांच्या नेतृत्वाखाली फिजिकल डायरेक्टर रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, फुटबॉल प्रशिक्षक महेश गोंडे, सर्व हाऊस मास्टर्स आणि पर्यवेक्षिका कु.ज्योती शेलार यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे.कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा माजी आमदार अशोकराव काळे, संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे, संस्था निरीक्षक नारायण बारे, संस्थेचे सर्व सदस्य व पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेतील मुलींचा संघ आणि विभागीय हॉकी स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!