ब्रेकिंग

झगडे फाटा-वडगाव पान रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी प्रयत्न करणार – आ. आशुतोष काळे

झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या कामास प्रारंभ,

झगडे फाटा-वडगाव पान रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी प्रयत्न करणार – आ. आशुतोष काळे
झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या कामास प्रारंभ,
कोपरगांव । विनोद जवरे ।
शिर्डीला वाहतूक कोंडी होवून साई भक्तांना त्रास होवू नये यासाठी पुणतांबा फाट्यावरून नेहमीच झगडे फाटा मार्गे अवजड वाहनांची वाहतूक वळविली जाते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होवून त्याचा प्रवाशांना व या राज्यमार्गा लगतच्या नागरिकांना होणारा त्रास कायमस्वरूपी थांबविण्यासाठी झगडे फाटा-वडगाव पान रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. राज्य मार्ग ६५ च्या झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याचे कोपरगाव तालुका हद्द या १० कोटीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.
मागील अनेक वर्षापासून राज्य मार्ग ६५ च्या झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याचे कोपरगाव तालुका हद्दीतील काम रखडल्यामुळे प्रवाशांना व राज्य मार्गा लगतच्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात या रस्त्यासाठी १० कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्या निधीतून या रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, मागील पाच ते सहा वर्षापासून राज्य मार्ग ६५ वरील झगडे फाटा ते तालुका हद्दीतील रस्त्याची दुरावस्था होवून छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरु झाली होती. या रस्त्याला निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १० कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. पुणतांबा फाटा ते झगडे फाटा, झगडे फाटा ते सावळीविहीर फाटा, तळेगाव दिघे-लोणी, नांदूर शिंगोटे हे सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग असून झगडे फाटा-वडगाव पान हा रस्ता मात्र राज्यमार्ग आहे. व सातत्याने शिर्डीला जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा फाट्यावरून या मार्गाने वळविली जात असल्यामुळे या रस्त्यावर बाहेरच्या वाहतुकीचा अधिकचा भार पडत आहे. त्यामुळे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग होण्यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. तसेच परिसरातील पोहेगाव-वेस रस्त्यासह सर्वच प्रमुख रस्त्यांसाठी निधी देणार आहे. तसेच रांजणगाव देशमुख ते बहादरपूर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर झाला असून या रस्त्याचे देखील काम लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे म्हणाले की, पोहेगाव हे बाजार पेठेचे गाव मात्र झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे पोहेगावची बाजारपेठ मंदावली होती व आर्थिक उलाढाल देखील कमी झाली होती. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाजारपेठ फुलणार असून आर्थिक उलाढाल देखील वाढणार आहे यात तिळमात्र शंका नाही. मात्र रस्त्यासाठी निधी आणतात आ. आशुतोष काळे आणि दुसऱ्या दिवशी ज्यांचे योगदान नाही ते जुना-पाना फोटो टाकून बातम्या प्रसिद्ध करतील की यांच्या मुळे झगडे फाटा-वडगाव पान रस्ता झाला हे ठरलेले असून फुकटचे क्रेडीट घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यामध्ये एकमेव कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नफ्यात आहे. त्यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला चांगले लोकप्रतिनिधी लाभले आहेत हे खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी देखील मान्य केले आहे. त्यामुळे अजून पंधरा ते वीस वर्ष तरी कोपरगाव मतदार संघाला आ.आशुतोष काळे यांची गरज असून त्यांच्या पाठीमागे जनतेने नेहमी खंबीरपणे उभे राहून मतदार संघाचा विकास करून घ्यावा असे अशोकराव रोहमारे यांनी सांगितले.  
    याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राहुल रोहमारे, शंकरराव चव्हाण, प्रविण शिंदे, वसंतराव आभाळे, गंगाधर औताडे, माजी संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, गोदावरी केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, केशवराव जावळे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, बाबुराव थोरात, नंदकिशोर औताडे, सचिन आव्हाड, के.डी. खालकर, योगेश औताडे, विरेंद्र शिंदे, संजय रोहमारे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, सुधाकर होन, बाळासाहेब आहेर, नामदेव आभाळे, माधवराव औताडे, संदीप रोहमारे, बाबुराव औताडे, वाल्मीक नवले, गोपीनाथ रहाणे, विलास चव्हाण, सतीश म्हाळसकर, मच्छिन्द्र रोहमारे, विलास पाचोरे, भाऊसाहेब सोनवणे, रामनाथ थोरात, मच्छिन्द्र सोनवणे, भानुदास रोहमारे, शिवाजी रोहमारे, कचेश्वर डुबे, सूरज औताडे, आत्याभाऊ वर्पे, शुभम रोहमारे, चंद्रकांतपाडेकर, कल्याण गुरसळ, राजेंद्र औताडे, रामचंद्र डांगे, महेंद्र वक्ते, बाळासाहेब औताडे, सखाराम घारे, हरिभाऊ जावळे, गोकुळ पाचोरे, शिवाजी वक्ते, भाऊ रहाणे, रामनाथ थोरात, रामनाथ घारे, दौलत गुरसळ, ज्ञानेश्वर गव्हाणे, पाटीलबा वक्ते, शंकरराव गुरसळ, विलास रोहमारे, नारायण होन, गोकुळ गुरसळ, धोंडीराम वक्ते, चांगदेव होन, कैलास होन, दिलीप नेहे, संदीप औताडे, पोपटराव गुंडे, संतोष वाके, गोरख जाधव, रवि भोसले, रविंद्र खरात, वाल्मिक घारे, आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!