ब्रेकिंग
पंचाळेत सद्गुरु योगिराज गंगागिरी महाराज 177 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे उद्या ध्वजारोहण
25 हजार भाविकांना महाप्रसादाचे आयोजन
पंचाळेत सद्गुरु योगिराज गंगागिरी महाराज 177 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे उद्या ध्वजारोहण

कोपरगांव । विनोद जवरे ।
पंचाळे येथे आयोजित श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज सरला बेटाच्या वतीने होणाऱ्या 177 वा फिरत्या नारळी सप्ताहाचे ध्वजारोहण कार्यक्रम बुधवार 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सरला बेटाच्या वतीने यावर्षीचा 177 वा फिरता नारळी सप्ताह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे नियोजित आहे . तब्बल बारा वर्ष सप्ताहाची मागणी केल्याने यावर्षी ग्रामस्थांना सप्ताहाचे यजमानपद प्राप्त झाले आहे यानिमित्ताने सप्ताहाची तयारी सुरू आहे पुढील महिन्यात 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट हा या सप्ताहाचा कालावधी आहे.साधारणता 15 ते 20 दिवस अगोदर या सप्ताहाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . पंचाळे गावाच्या पूर्वेस वावी ते शहा रस्त्यादरम्यान या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे

या ध्वजारोहण कार्यक्रम निमित्ताने ग्रामदैवत पूजन, मिरवणूक झाल्यानंतर मिरवणूक सप्ताह स्थळी पोहोचल्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.यासाठी 51 फूट उंच ध्वज निर्मिती करण्यात आली असून नऊ मीटर कापडी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे.या ध्वजारोहण कार्यक्रमास महंत रामगिरी महाराज यांचे सह भास्कर गिरी , रमेश गिरी, शिवानंद गिरी, खासदार राजाभाऊ वाजे ,आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव, उपाध्यक्ष राजेश गडाख, सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले ,शिवाजी महाराज तळेकर, पांडुरंग गिरी महाराज वावीकर ,रामकृष्ण महाराज लहवितकर, काशीकानंद गिरी, हरिभक्त परायण रेखाताई काकड आदींसह नाशिक नगर जिल्ह्यातील भाविक या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होणार आहे

ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने बुधवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांची गावातून मिरवणूक व प्रदक्षिणेचा कार्यक्रम होणार असून या निमित्ताने लेझीम पथक बँड पथक भजनी मंडळ व नंदुरबार येथील आदिवासी नृत्य पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे