ब्रेकिंग

शिर्डी येथील हॉटेलमध्ये बनावट आधारकार्ड देवुन, मुक्कामी असलेले २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

शिर्डी येथील हॉटेलमध्ये बनावट आधारकार्ड देवुन, मुक्कामी असलेले २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

कोपरगांव । प्रतिनिधी ।

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक १७ जुलै २०२४ रोजी शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री या ठिकाणी २ संशयीत इसम बनावट आधारकार्ड देवुन मुक्कामी थांबलेले होते. हॉटेल टेम्पल ट्री मधील मॅनेजर यांना आधारकार्ड बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारी अर्जाचे चौकशीमध्ये हॉटेल टेम्पल ट्री मध्ये थांबलेल्या २ इसमांनी बनावट आधारकार्ड देवुन वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने पोकॉ गणेश रघुनाथ घुले शिर्डी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पो.स्टे.गु.र.नं. ४२२/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३३६, ३३६ (२), ३३६ (३), ३३७, ३४० (२) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना घडल्यानंतर २ दहशतवादी हल्लेखोर शिडींमध्ये येवुन राहिल्याची बातमी पसरल्याने
शिर्डी परिसरातील हॉटेल व इतर व्यवसायीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना वर नमूद गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबत आदेशित केले होते.त्याच आदेशान्वये पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि समाधान भाटेवाल तसेच अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कडीले, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, फुरकान शेख, संतोष खैरे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित येमुल व संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन वर नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले होते. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच शिडी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे जावुन सदर ठिकाणावरील तसेच हॉटेलच्या आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन संशयीतांचे फोटो गुप्तबातमीदारांना प्रसारीत केले. पथक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक १९ जुलै २०२४ रोजी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की. प्रसारीत केलेल्या फोटोतील २ संशयीत इसम हे काळ्यारंगाचे विना क्रमांकाचे महिंद्रा थार गाडीमधुन छत्रपती संभाजीनगर येथुन नेवाशाच्या दिशेने येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून खात्री करुन आरोपी विरुध्द कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकाने तात्काळ खडका फाटा, ता. नेवासा येथील टोल नाका येथे जावून सापळा रचुन थांबलेले असतांना थोडाच वेळात काळ्या रंगाची विना क्रमांकाची बार गाडी येताना पथकास दिसली. पथकाने सदर गाडी थांबवण्याचा इशारा करताच संशयीतांनी ताब्यातील थार गाडी छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने वळवुन पळून जाण्याच्या तयारीत असतांना पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे वसीम ताहीर शेख वय, रा. बिलोली, जिल्हा नांदेड व फिरोज रफीक शेख रा. सुतारगल्ली, बिलोली, जिल्हा नांदेड असे असल्याचे सांगितले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांचा कडे त्यांनी हॉटेल टेम्पल ट्री. शिडी येथे हॉटेल मधील रुम बुक करण्यासाठी दिलेले बनावट आधारकार्डच्या २ झेरॉक्स मिळून आल्या. वरील दोन्ही इसमांकडे हॉटेल टेम्पल ट्रो, शिडी येथे बनावट आधारकार्ड देवून रुम बुक करुन राहण्याचे कारणाबाबत विचारपुस करता दोन्ही संशयीत हे बनावट सोने आणुन शिर्डी परिसरातील नागरीकांच्या ओळख करुन, नागरीकांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडे असलेले केमीकलचे आधारे बनावट सोने हे खरे असल्याचे भासवुन विक्री करणे करीता असल्याचे सांगितल्याने त्यांचेकडील बंगची झडती घेतली असता त्यांचेकडे विविध प्रकारचे रसायनांच्या वाटल्या, मोबाईल फोन व महिंद्रा कंपनीची धार असा एकुण १३,३५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींना ताब्यात घेवुन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुवमें, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. शिर्डी या ठिकाणी बनावट आधारकार्ड देवुन संशयीतरित्या वास्तव्य करणारे आरोपींना खडका शिवार, ता. नेवासा येथुन अटक करण्यात आली असून आरोपी हे दहशतवादी हल्लेखोर नाहीत. आरोपी हे बनावट सोने खरे असल्याचे भासवुन विक्री करणे करीता आल्याचे निष्पन्न झाल्याने शिर्डी परिसरातील व जिल्ह्यातील नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये असे अवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!