ब्रेकिंग
स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा – डॉ.जयश्रीताई थोरात
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा – डॉ.जयश्रीताई थोरात

संगमनेर । विनोद जवरे ।
योगामुळे प्रत्येकाचे शरीर हे निरोगी राहत असून योगामुळे दिवसभर काम करण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते. योग ही भारतीय समृद्ध परंपरा असून प्रत्येकाने दररोज वेळ काढून चांगल्या आरोग्यासाठी योगा करा. आनंदी जीवनासाठी स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि जबरदस्त रहा असा सल्ला कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत आंतरराष्ट्रीय योग साजरा करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश, प्रा. व्ही.बी. धुमाळ, प्रा. जी.बी. काळे, प्राचार्य डॉ मच्छिंद्र चव्हाण, डॉ मनोज शिरभाते, डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ जे बी गुरव, सौ जे बी सेट्टी, श्रीमती शितल गायकवाड ,अंजली कन्नावार, विलास भाटे, विजय वाघे आदींसह सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असून भारताने जगाला दिलेली ही देण आहे. योगामुळे मन प्रसन्न होते काम करण्यास ऊर्जा मिळते. ताण तणाव आणि धावपळीच्या जीवनामुळे हृदयविकारासह अनेक आजार माणसांना जडले जातात. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आनंदी राहणे गरजेचे आहे.आणि तणावमुक्त जीवनासाठी योगा अत्यंत गरजेचे आहे .म्हणून प्रत्येकाने वेळ काढून योगा करत आनंदी जीवन जगा असा सल्ला देताना मस्त रहा स्वस्त रहा जबरदस्त रहा असेही त्या म्हणाल्या.

तर अनिल शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्तेतून आपला लौकिक निर्माण केला आहे. याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी हा असा 11000 सदस्यांचा मोठा परिवार असून प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी ही घेतली जात आहे. योगा दिनातून प्रत्येकाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी संस्थेतील विविध महाविद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते