अनावश्यक खर्चाला फाटा देत पुण्यस्मरण दिनी देश सेवकांसह कुटूंबाचा केला सन्मान
अनावश्यक खर्चाला फाटा देत पुण्यस्मरण दिनी देश सेवकांसह कुटूंबाचा केला सन्मान
कोपरगाव । विनोद जवरे ।
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील रहिवाशी व प्रसिद्ध जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ज्ञानदेव पर्वत राहाणे यांचे चौथे पुण्यस्मरण नुकतेच समाजप्रबोधनकार ह.भ.प मयुरीताई शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतून प्रवचनाने व हजारो नातेवाईक मित्रपरिवार व राहाणे सर यांच्या वर प्रेम करणाऱ्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत झाले.
या प्रसंगी राहाणे परिवाराच्या वतीने अनावश्यक खर्च टाळत परिसरातील वेगवेगळ्या विभागातून देशसेवा करणाऱ्या युवक- युवतीचा तसेच त्यांच्या मातापित्यांचा गावातील ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील देशसेवेत भर्ती झालेले सैनिक, पोलिस अधिकारी व कर्मचारी, बी एस एफ, सि आर पी एफ आदी क्षेत्रातील देशसेवक व त्यांचे कुटूंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीते साठी कै ज्ञानदेव पर्वत राहाणे यांची पत्नी वंदना ज्ञानदेव राहाणे, भाऊ दिलदार राहाणे, दिलखूष राहाणे, मुलगा प्रसाद राहाणे, पुतण्या सूरज राहाणे, तेजस राहाणे, बहीण गंगुबाई शिंदे, मुलगी प्राजक्ता कानवडे, जावई प्रणय कानवडे, राहुल घुले यांच्या सह समस्त राहाणे परिवाराने अथक परिश्रम घेतले तर असा आगळा वेगळा कार्यक्रम करत ज्ञानदेव राहाणे सरांच्या आठवणींना त्यांचा समस्त नातेवाईकांनी उजाळा दिला आहे. या प्रसंगी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.