ब्रेकिंग
आजची महिला ही सर्व क्षेत्रात अव्वलस्थानी- पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ
महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
आजची महिला ही सर्व क्षेत्रात अव्वलस्थानी- पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ

महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
कोपरगांव । विनोद जवरे ।
आजच्या २१ व्या शतकातील महिला ही कोणत्याच क्षेत्रात मागे नसून ती प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानी असल्याचे गौरवोद्गार शिर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक राणी वरगुडे, पोलीस नाईक लता जाधव, पोलीस नाईक रूपाली राजगिरे, पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा भारमल, पोलीस कॉन्स्टेबल रूपाली सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल शालिनी सोळसे, पोलीस कॉन्स्टेबल वैशाली पन्हाळे, पोलीस नाईक अनिता वलवे, पोलीस नाईक सरिता रासकर, पोलीस नाईक मोहिनी ताके आदी महिलापोलिस कर्मचाऱ्यांचा पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी दुधाळ यांनी पुढे बोलताना सांगितले की, आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच आकाशी गरुड झेप घेतली असून प्रत्येक क्षेत्रात तिने आपल्या कर्तुत्व व हुशारीच्या बळावर मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आज देशाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपती म्हणून महिलाच विराजमान असल्याचे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी व्यक्त करत आपण पोलीस कर्मचारी म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करत असून ते यापुढेही असेच करत राहावे असे बोलून सर्व महिलांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या गेल्या ७ वर्षात प्रथमच सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आल्याने अनेक महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.