महिला दिनानिमित्त एकविरा क्रिकेट स्पर्धेसाठी तालुक्यात महिलांची जय्यत तयारी
क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत 1500 महिलांचा सहभाग

महिला दिनानिमित्त एकविरा क्रिकेट स्पर्धेसाठी तालुक्यात महिलांची जय्यत तयारी

महिला दिनानिमित्त एकविरा क्रिकेट स्पर्धेसाठी तालुक्यात महिलांची जय्यत तयारी
क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत 1500 महिलांचा सहभाग

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे शुक्रवार दिनांक 6 मार्च 2025 ते 10 मार्च 2025 या काळात महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यासाठी मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली असून या मैदानाची व तयारीची पाहणी कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केली. यावेळी समवेत एकविरा फाउंडेशनच्या विविध सदस्या उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत 70 संघांचा सहभाग असून या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे,कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, सौ.शरयूताई देशमुख, व संगमनेर मधील विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेबरोबरच महिलांची आरोग्य तपासणी ही या ठिकाणी होणार आहे. यावेळी नामवंत स्री रोग तज्ञ व कॅन्सर तज्ञ उपस्थित राहून महिलांची तपासणी करणार आहेत. संगमनेर तालुक्यातील खेडोपाडी तसेच संगमनेर शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये महिलांचा क्रिकेट उत्साह मोठा दिसून येत असून यासाठी गावोगावी महिलांची प्रॅक्टिस सुरू आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस 11000 द्वितीय बक्षीस 7000 व तृतीय बक्षीस 5000 ठेवण्यात आले असून लहान गट,मोठा गट व खुला गट असे तीन गट मधून हे सर्व बक्षिसे दिले जाणार आहेत.तरी महिला दिनानिमित्त होणाऱ्या आरोग्य शिबिर व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि रस्सीखेच स्पर्धेसाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.जयश्रीताई थोरात व एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
महिला आरोग्य तपासणी शिबिरजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाच्या स्वतंत्र दालनामध्ये येणाऱ्या सर्व महिला भगिनींची तज्ञ स्री रोगतज्ञ व कॅन्सरतज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये विविध तपासण्या होणार असून अधिक उपचार व पुढील तपासणी करता एसएमबीटी क्लिनिकच्या माध्यमातून उपचार केले जाणार असल्याचे या शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.