संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी गावचे डॉ. स्वप्निल गुलाब ताजणे यांना भारती विद्यापीठ , पुणे यांच्या वतीने सर्जरी विभागातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की, ढोलेवाडी गावातील डॉ. स्वप्नील गुलाब ताजणे यांनी पुणे विद्यापीठात शल्य (सर्जरी) विभागातील पीएचडी पदवी मिळवली असून या पद्धतीचे प्रमाणपत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते देण्यात आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात गुणवत्तेच्या बाबतीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ढोलेवाडी गावातील गुलाब ताजने ही पीएचडी मिळवणारे पहिले विद्यार्थी ठरले आहेत त्यांना भारती विद्यापीठाचे उपप्राचार्य डॉ राहुल वसंतराव कदम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे वडील गुलाब ताजने हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात सेवा करत आहेतजाहिरात
डॉ स्वप्नील ताजने यांच्या यशाबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हाईस चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देशपांडे, मेडिकल डायरेक्टर डॉ काटकर, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, यांनी अभिनंदन केले आहे