ब्रेकिंग

गौतम पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकलचे 30 विद्यार्थ्यांना निकालापुर्वीच नामांकित कंपण्यामध्ये नोकरीच्या संधी

गौतम पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकलचे 30 विद्यार्थ्यांना निकालापुर्वीच नामांकित कंपण्यामध्ये नोकरीच्या संधी

गौतम पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकलचे 30 विद्यार्थ्यांना निकालापुर्वीच नामांकित कंपण्यामध्ये नोकरीच्या संधी

कोपरगांव । प्रतिनिधी । कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातील ३0 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती गौतम पॉलिटेकनिक इंस्टीट्युटचे प्राचार्य प्रा.सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्रा. कैलास भोसले यांनी दिली आहे. यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीत 0३, टाटा मोटर्स १0, भारत गेअर 0८, अभिराज मॅन पावर ०१  कायनेटिक  इंजीनीरिंग मध्ये 0८ अशा एकूण ३० विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नोकऱ्या मिळाल्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरवर्षी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्याना निकालापूर्वीच नामांकित कंपन्या नोकरीत सामावून घेत आहे.महाविद्यालयाचा  निसर्गरम्य  परिसर, विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी परिश्रम घेणारे प्राचार्य, सहकारी प्राध्यापक, सर्व सोयीयुक्त वर्कशॉप विभाग, प्रयोगशाळा विभाग अशा सर्व  सुविधांमुळे महाविद्यालयाचा  नावलौकिक वाढत  आहे. त्यामुळे  ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे गौतम पॉलिटेकनिक इंस्टीट्युटच्या माध्यमातून अभियंता होण्याचे स्वप्न साकार होत आहे.अभियांत्रिकी पदवी हातात पडत नाही तोच महाविद्यालयाच्या प्रयत्नातून या विद्यार्थ्यांचे नोकरीचे देखील स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट मध्ये प्रवेश घेवून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीत तसेच बहुसंख्य नामांकित कंपन्यांमध्ये उच्चपदी मोठ्या पगारावर कार्यरत आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन मा.. अशोकराव काळे,  विश्वस्त आ.शुतोष काळे व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव सौ.चैतालीताई काळे, संस्थेचे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्रशासकीय अधिकारी प्रा.नारायण बारे, प्राचार्य प्रा.सुभाष भारती, कार्यालयीन अधीक्षक आण्णासाहेब बढे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!