कोपरगाव सचिन वॉच दुकानावर जबरी दरोडा; ३२ लाखाचा ऐवज लंपास

कोपरगाव सचिन वॉच दुकानावर जबरी दरोडा; ३२ लाखाचा ऐवज लंपास
कोपरगाव सचिन वॉच दुकानावर जबरी दरोडा; ३२ लाखाचा ऐवज लंपास
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाजी मंडई जवळील प्रसिद्ध सचिन वॉच या अत्याधुनिक घड्याळाच्या दुकानावर शनिवारी मध्यरात्री दरोड्याची घटना घडल्याने संपूर्ण कोपरगाव शहरातील व्यापारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील भाजी मंडई जवळील गुरुद्वार रोडला संजय लोहाडे व सनी लोहाडे यांच्या मालकीचे सचिन वॉच हे अत्याधुनिक घड्याळाचे दुकान असून या दुकानावर शुक्रवार दि १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ ते शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी चादरीचा आडोसा करत दुकानाचे शटर उचकटुन दुकानातील टायटन कंपनीचे १५५ व टायमॅक्स कंपनीचे १२० असे २९ लाख २२ हजार रुपये किमतीचे २७५ घड्याळे व रोख रक्कम ३ लाख ४७ हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून संजय लालचंद जैन यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १८९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४) ३०५ (अ) प्रमाणेच गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहे सदरची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

सदर घटनेची माहिती मिळतात कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार,भूषण हंडोरे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते तर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी देखील घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली तसेच पोलिसांना तपासाकामी योग्य त्या सूचना केल्या तर दुकानातील व आसपासच्या सीसीटीव्हीची तपासणी सुरू करत तपासणी कामी वेगळे पथके तयार केली तर पोलिसांनी डॉग्स स्कॉड़ तर्फे देखील परिसराची तपासणी केली आहे.