जोर्वे येथील दावल मालिक बाबा सर्व धर्मीयांचे शक्ती स्थळ
जोर्वे येथील दावल मलिक बाबा समतेचे प्रतीक

जोर्वे येथील दावल मालिक बाबा सर्व धर्मीयांचे शक्ती स्थळ
जोर्वे येथील दावल मालिक बाबा सर्व धर्मीयांचे शक्ती स्थळ
जोर्वे येथील दावल मलिक बाबा समतेचे प्रतीक
संगमनेर । प्रतिनिधी । मानवता हाच खरा धर्म आहे यासाठी सर्व धर्मीयांमध्ये संत महात्मे समाज सुधारक यांनी मोठी जनजागृती करून मानवता धर्म वाढवला आहे हीच परंपरा जोरवे येथे असलेल्या दावलमालिक बाबाच्या यात्रेत सर्वांना पहावयास मिळत असून या यात्रेमध्ये पंचक्रोशीतील सर्व धर्माचे लोक एकत्र सहभागी होतात हे समतेचे असल्याने सर्वांचे मोठे श्रद्धास्थान ठरले आहे.
जोर्वे संस्कृती ही अत्यंत प्राचीन संस्कृती आहे महाराष्ट्र आणि संगमनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे याच भूमितील सुपुत्र सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आणि तालुक्याच्या विकासाचा पाया घातला.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार
वारकरी संप्रदायाची पताका घेऊन समाज कार्य करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दावल मालिक या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला आणि त्यातून 20 ऑक्टोबर 1988 रोजी या मंदिराचे बांधकाम व सुशोभीकरण पूर्ण करण्यात आली असून या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी हे मोठे श्रद्धास्थान ठरले आहे.
वारकरी संप्रदाय, व संत महात्म्यांचा विचार घेऊन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा विकासाचा आणि विचारांचा वारसा जोपासला. याचबरोबर आपली मातृभूमी असलेल्या जोर्वेमध्ये अनेक विकास कामे मार्गी लावताना दत्त मंदिर सुशोभीकरण, विविध मंदिरांचे सभामंडप, प्रवरा नदीकाठी घाटाचे बांधकाम, प्रवरा नदीवरील पूल, पिण्याच्या पाणी व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, या सर्व मूलभूत सुविधा निर्माण करून दिल्या. या गावाचे आदर्श वैशिष्ट्य असलेले दावल मलिक बाबा हे पंचक्रोशीतील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात होणाऱ्या यात्रेनिमित्त या ठिकाणी संदल उरूस असे अनेक विविध कार्यक्रम होत असतात 37 वर्षांपूर्वी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे.

कर्डिले परिवार हा या मंदिराची सेवा करत असून तीन पिढ्यांची परंपरा त्यांनी जोपासली आहे. दावल मलिक बाबाच्या यात्रेनिमित्ताने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या भागांमध्ये येत असून समतेचे प्रतीक आणि बंधू भावाचे वातावरण निर्माण करणारे, जातीभेद उच्चनीचता गरीब श्रीमंती असे सर्व भेद नष्ट करून सर्व समाजातील नागरिकांना मानवतेचा मंत्र देणारे हे मंदिर असल्याचे पुजारी कर्डिले यांनी म्हटले आहे. 19 ते 21 एप्रिल 2025 अशी तीन दिवस ही यात्रा असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जोर्वे ग्रामस्थांनी केले आहे