ब्रेकिंग

किसन भाऊ हासे यांची प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, मुंबई कार्याध्यक्षपदी निवड

किसन भाऊ हासे यांची प्रेस कौन्सिल
ऑफ महाराष्ट्र, मुंबई कार्याध्यक्षपदी निवड

किसन भाऊ हासे यांची प्रेस कौन्सिल
ऑफ महाराष्ट्र, मुंबई कार्याध्यक्षपदी निवड

कोपरगांव । प्रतिनिधी । महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारीता व पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी 30 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणारे किसन भाऊ हासे यांची मुंबई येथील प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र  संस्थेच्या कार्याध्यक्षपदी  निवड झाल्याचे संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. इलियास खान यांनी कळविले आहे. या नियुक्तीने श्री. किसन हासे करत असलेल्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. छोट्या वृत्तपत्रांच्या व संपादक पत्रकारांच्या शासन स्थरावरील प्रश्‍न सोडविण्यासाठी  किसन भाऊ हासे व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. राज्यातील संपादक पत्रकारांच्या संघटनांसाठी त्यांनी अनेक अधिवेशने, राज्य परिषदा आयोजीत करून संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई  या संस्थेद्वारे संघटनात्मक बांधणी केली आहे.  2007 साली त्यांनी महाराष्ट्र संपादक डायरीची निर्मिती करीत असतांना संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. संपादक पत्रकारांच्या अडचणीच्या प्रसंगी विविध ठिकाणी भेटी देऊन ते सहकार्य करीत आहेत. प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ही लढाऊ पत्रकारांची संस्था असून या संस्थेद्वारे वृत्तपत्रांवरील व पत्रकारांवरील अन्याय दुर करण्यासाठी प्रसंगी न्यायालयात धाव घेऊन अडचणींची सोडवणूक केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या विविध शासकीय समित्यांवर पत्रकारांच्या नेमणूका व्हाव्यात म्हणूनही संस्था सातत्याने कायदेशीर लढा देत असल्याची माहिती अ‍ॅड. इलियास खान यांनी दिली आहे. पत्रकारांच्या लढ्यात किसन भाऊ हासे यांनी सतत खंबीर साथ दिल्याने त्यांची कार्याध्यक्षपदी निवड केल्याचे अ‍ॅड. खान यांनी नमूद केेले आहे. या निवडीनिमित्त किसन भाऊ हासे यांचे राज्यातील संपादक व पत्रकारांकडून विशेष अभिनंदन होत असून त्यांच्या कार्यात सक्रिय सहभागी राहाण्याची भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
जाहिरात

प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या संस्थेचे लवकरच मुंबई येथे राज्य अधिवेशन घेतले जाईल. शासन स्थरावरील वृत्तपत्रे व पत्रकारांच्या संदर्भातील उर्वरीत प्रश्‍नांसदर्भात योग्य निर्णय करून ग्रामीण पत्रकारीतेस न्याय दिला जाईल. याकामी  किसन भाऊ हासे  यांचे सहकार्य लाभेल आणि प्रश्‍नांची सोडवूणकही केली जाईल. असा विश्‍वास संस्थेचे संस्थापक अ‍ॅड.इलियास खान यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!